शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या १३० शाळांमध्ये ‘ई लर्निंग’

By admin | Updated: August 8, 2014 00:07 IST

खासगी शाळांत असलेल्या सुविधांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कमी पडत होत्या. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदांच्या शाळेतही शिक्षणाशी संबंधित असलेल्या अत्याधुनिक सुविधा देण्यात

वर्धा : खासगी शाळांत असलेल्या सुविधांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कमी पडत होत्या. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदांच्या शाळेतही शिक्षणाशी संबंधित असलेल्या अत्याधुनिक सुविधा देण्यात येत आहे. वर्धेत एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या चार तालुक्यातील १३० शाळात ‘ई लर्निंग’ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा गुरुवारी वर्धा पंचायत समितीच्या सभागृहात शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आठही तालुक्यात एकूण ९३४ शाळा आहेत. यात पहिल्या टप्प्यात १३० शाळांत हा प्रकल्प सुरू करण्यात आला. यात वर्धा, हिंगणघाट, सेलू व देवळी येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांचा समावेश आहे. यातही दोन भाग करण्यात आले आहेत. ज्या शाळांची पटसंख्या शंभरपेक्षा कमी आहे अशा शाळेत लॅपटॉपसह एलसीडी टिव्ही तर ज्या शाळांची पटसंख्या शंभरच्यावर आहे, अशा शाळेत लॅपटॉपसह प्रोजेक्टर देण्यात आले आहे. या प्रकल्पात निवड झाली आहे त्या शाळांतील शिक्षकांना पंचायत समितीच्या सभागृहात आज प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता. कार्यक्रमाला जि. प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी, शिक्षणाधिकारी प्राथमिक धनराज तेलंग यांच्यासह संबंधीत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. वाढत असलेल्या कान्व्हेंट संस्कृतीत जिल्हा परिषदेच्या शाळांत सुरू होत असलेल्या या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांना लाभ होवून ते शहरी मुलांच्या स्पर्धेत टिकतील, अशा प्रतिक्रीया अतिथींनी व्यक्त केल्या. शाळेतील उपकरणातील बिघाड दुरूस्तीकरिता संस्थेचा व्यक्ती राहणार आहे. तो वेळोवेळी या उपकरणाची पाहणी करतील, असे संस्थेचे उपक्रम संयोजक के.बी. वाळके यांनी सांगितले. कंपनीच्यावतीने पहिल्या टप्प्यात सांंगण्यात आलेले कार्य पूर्ण झाले आहे. येत्या दिवसात उर्वरीत शाळांचाही समावेश करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला शिक्षकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)