शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना नियमाप्रमाणे वेतन व सुविधा देणे व्यवस्थापकाचे कर्तव्य

By admin | Updated: April 24, 2017 00:20 IST

शासकीय नियमाप्रमाणे वेतन भविष्य निर्वाह निधी कामगार विमा योजनेचा लाभ व इतर सुविधा कामगारांना मिळाल्या पाहिजे.

रामदास तडस यांच्या मध्यस्थीने संप मागे : मागण्या मान्य न केल्यास स्वत: उपोषण करणार पुलगाव : शासकीय नियमाप्रमाणे वेतन भविष्य निर्वाह निधी कामगार विमा योजनेचा लाभ व इतर सुविधा कामगारांना मिळाल्या पाहिजे. पुलगाव कॉटन मिल बंद पडल्यामुळे शहरातील हजारो कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गत ८-९ वर्षांपासून नव्याने जयभारत टेक्सटाईल्स या नावाने हा वस्त्रोद्योग सुरू झाला असून जवळपास ४०० युवकांना रोजगार मिळाला खरा; पण अत्यल्प वेतनावर काम करणाऱ्या कामगारांनी प्रत्येकवेळी प्रशासनाशी तडजोड करून उत्पादन सुरू ठेवले. कामगार न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कामगारांना शासकीय नियमानुसार वेतन व इतर सुविधा देणे व्यवस्थापकांचे कर्तव्य आहे. जर कामगारांच्या मागण्या केल्या नाही तर मी स्वत: मील समोर उपोषणास बसणार आहे. तसेच या संदर्भात मील मालक प्रवीण तायल यांच्याशी मुंबई येथे चर्चा करून आठ दिवसांत हा प्रश्न निकाली काढू, तोपर्यंत संप स्थगित करून उद्यापासून कामगारांनी काळ्या फिती लावून कामावर रूजू व्हावे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. या आश्वासनावर संप स्थगित करण्यात आला. विविध मागण्यांसाठी जयभारत टेक्सटाईल्स या वस्त्रोद्योगातील कामगारांनी १६ एप्रिलपासून संप पुकारला होता. २१ एप्रिल रोजी नागपूर येथे कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापक यांच्यात झालेली चर्चा फिस्कटली. या चर्चेत व्यवस्थापकाकडून कामगारांना दरमहा १० रुपये प्रतिदिन प्रमाणे महिन्याची २५० ते ३०० रुपये वाढ, तिसऱ्या पाळीत काम करणाऱ्या कामगारास या व्यतिरिक्त प्रतिदिन २० रुपये वाढ तसेच कामगारांचे वेतन दरमहा १५ ते १८ तारखेपर्यंत नियमीत करण्यासंदर्भात चर्चा झाली. याशिवाय व्यवस्थापनाच्या मॉलमधून जीवनावश्यक वस्तूचा उधारीवर पुरवठा करणे हा मुद्दाही चर्चेत होता. परंतु या मागण्या मान्य न झाल्यामुळे आज अखेर खा. तडस यांनी कामगार मंडपास भेट दिली. तसेच व्यवस्थापनाच्यावतीने उपस्थित असणारे व्यवस्थापक अशोक रायजादा, कारखाना व्यवस्थापक विनोद पांडे, महादेव कणसे, जयभारत टेक्सटाईल्स कामगार संघटनेचे मार्गदर्शक कामगार नेता भाष्कर इथापे, अध्यक्ष बाळू शहागडकर, सचिव अमित शेळके यांच्यात चर्चा झाली. येत्या आठ दिवसांत उद्योगाचे अध्यक्ष प्रवीण तायल यांच्याशी मुंबई येथे कामगार प्रतिनिधी व मालकात खा. तडस यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. तोपर्यंत संप स्थगित करण्यात आल्याचे कामगार नेता इथापे यांनी भाषणातून जाहीर केले. याप्रसंगी जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, पं.स. सदस्य किशोर गव्हाळकर, नितीन बडगे, दीपक फुलकरी, कपील शुक्ला, कामगार प्रतिनिधी दिनेश खेडेकर, विनोद बाभुळकर यांच्यासह मोठ्या संख्येने कामगारांची उपस्थिती होती. प्रास्ताविक ओंकार धांदे यांनी केले. यावेळी बसपा कामगार संघटनेचे सिध्दार्थ डोईफोडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार दिनेश खेडकर यांनी मानले. काही महिला कामगारांनी व्यवस्थापनाबाबत खा. तडस यांच्याकडे तक्रार केली असता खा. तडस यांनी व्यवस्थापक रायजादा यांना या तक्रारीकडे लक्ष देण्याची सूचना दिली.(तालुका प्रतिनिधी)