शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराच्या तांदळात सोंडे अन् अळ्या

By admin | Updated: July 9, 2017 00:35 IST

शासनाने मध्यान्ह भोजनाच्या नावावर सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार योजना सुरू केली.

पिपरी (मेघे) येथील प्रकार : जि.प. शिक्षण विभागाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शासनाने मध्यान्ह भोजनाच्या नावावर सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार योजना सुरू केली. यातून कुपोषणावर मात करण्याचे स्वप्न पाहिले; पण यात पोषक धान्याचा पुरवठा केला जात नसल्याचे समोर आले आहे. पिपरी (मेघे) येथील जि.प. प्राथमिक शाळेत पोषण आहारातील तांदळामध्ये अळ्या व सोंडे आढळून आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांतील मुलांचे पोषण व्हावे, त्यांना सकस आहार पुरविता यावा म्हणून शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली; पण त्यातील अन्नधान्याकडे लक्ष दिले जात नसल्याची बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. सध्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना तांदूळ पुरविला जातो. हा तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे दिसून येत आहे. यावरून शासन चिमुकल्यांचे अळ्या, सोंडे असलेल्या धान्यातून पोषण करीत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. पिपरी (मेघे) येथील जि.प. प्राथमिक शाळेमध्ये शासनाच्या पुरवठा विभागाकडून पुरविण्यात आलेल्या तांदळामध्ये अळ्या आणि सोंडे असल्याचे समोर आले आहे. याच तांदळापासून तयार केलेली खिचडी चिमुकल्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन म्हणून दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. जि.प. शाळांमध्ये गोरगरीब पालकांची मुले शिक्षण घेतात. मुले गरीब घरची असली तरी त्यांचे पालक त्यांना चांगले अन्न देण्याचा प्रयत्न करीत असतात; पण शाळेमध्ये अळ्या, सोंडेयुक्त तांदळाची खिचडी दिली जात असल्याने पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. जि.प. शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचेच दिसून येत आहे. यावरून शाळेत दिला जाणारा पोषण आहार खरोखरच पोषक आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जि.प. शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.