शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही बळीराजावर ओलिताचे संकट

By admin | Updated: August 10, 2014 23:09 IST

खरीप हंगामाला प्रारंभ झाला त्या काळापासूनच यंदा पावसाने डोळे वटारले. अशात उशिरा आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या उगविल्या. दरम्यान पावसाने पुन्हा मारलेल्या दडीमुळे उगविलेले

घोराड : खरीप हंगामाला प्रारंभ झाला त्या काळापासूनच यंदा पावसाने डोळे वटारले. अशात उशिरा आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या उगविल्या. दरम्यान पावसाने पुन्हा मारलेल्या दडीमुळे उगविलेले पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे. पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांना ओलीत करून पीक वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. यंदा भर पावसाळ्यातही शेतातील पिकांना ओलीत करावे लागत असून शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडत आहे़दुबार तिबार पेरणीकरून हतबल झालेल्या शेतकऱ्याने पेरलेल्या बियाण्याचे रूपांतर रोपट्यात झाले. आता पावसाने धोका दिल्याने हे रोपटे कसे जगवावे, असा प्रश्न ओलिताचे साधन नसलेल्या बळीराजापुढे पडला आहे़ उन्हाळ्यात तापते तशी उन्ह पावसाळ्यात तापत असल्याने रोपटे पुन्हा करपू लागले आहेत. ८ जून पासून खरीप हंगामाला प्रारंभ झाला. ८ जुनला मृग नक्षत्र हत्तीवाहन घेवून आले. २२ जूनला आर्द्रा नक्षत्र मोरावर आले तर ६ जुलैला पुनर्वसू नक्षत्र आले. १० जुलैला पुष्य नक्षत्र तर ३ आॅगसट पासून आश्लेषा नक्षत्र सुरू झाले. पावसाचे पाचही नक्षत्र कोरडे गेले. झालेल्या नक्षत्रात जवळपास १० ते १२ दिवस पाऊस पडला. यात जून महिन्यात १८३़९ मि़मी़ जुलै महिन्यात ३२१ मि़मी़ आॅगस्ट मध्ये आता पर्यंत ३ मि.मी़ पावसाची नोंद तालुक्यात झाली आहे. गत आठवडाभर श्रावणातील एकही सर येथे आली नसल्याने शेतकऱ्यांनी पिकाला तुषार सिंचन व ठिंबक सिंचनाच्या सहाय्याने ओलीत करण्यात सुरुवात केली आहे़ ओलीत करायचे तर किती एकरातील पिकाचे करायचे आणि कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसामोर उभा ठाकला आहे़ स्प्रिंकलर वारंवार बदलावे लागत असल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागते आहे़नुकतेच शेतकऱ्यांनी पिकात तण वाढले म्हणून डवरणी व निंदन केले तर झाडाला आधार देण्यासाठी सरी फाडण्यात आल्या. त्यामुळे जमिनीतील ओल तुटल्या गेली. सतत तापत असलेल्या रखरखत्या उन्हामुळे जमिनीला भेगा गेल्या आहेत. पानबसन क्षेत्रालाही पावसाची नितांत आवश्यकता आहे़ ओलीताचे साधन असलेले शेतकरी कसेबसे पीक वाचविण्याचा खटाटोप करतील पण अजून काही दिवस पाऊस आला नाही तरी रोपटे जगतीलच हे सांगणे कठीण आहे़ यामुळे यंदाचा खरीप हातचा गेल्यातच आहे. (वार्ताहर)