शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवाकरिता दुर्गा मंडळे सज्ज

By admin | Updated: October 11, 2015 00:20 IST

जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाला एक परंपरा आहे. त्या परंपरेनुसार शासकीय नियमांना अनुसरून जिल्ह्यातील मंडळे आपापली तयारी करीत आहेत.

मातृशक्तीचा जागर : शहरासह जिल्ह्यात नऊ दिवस भरगच्च कार्यक्रम वर्धा : जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाला एक परंपरा आहे. त्या परंपरेनुसार शासकीय नियमांना अनुसरून जिल्ह्यातील मंडळे आपापली तयारी करीत आहेत. जिल्ह्याचे आकर्षण ठरणारा नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. यानुसार मंडळांकडून त्यांच्या तयारीलाही वेग आला आहे. नवरात्रोत्सवादरम्यान, वर्धेसह आसपासच्या परिसरातील दुर्गोत्सव मंडळांकडून विविध देखावे तयार करण्याकडे नेहमीच भर राहिला आहे. तर मंडळाच्या परिसर होत असलेल्या विविधरंगी रोषणाईने उजळून निघणार असल्याचे चित्र आहे. यंदा रोषणाई करण्याकरिता नवी लाईटींग व नवे दिवे आणल्याचे दिसून आले आहे. मंडळाकडून होत असलेल्या रोषणाईत वीज चोरी होवू नये याकरिता महावितरणच्यावतीने या मंडळांना कमी दर आकारून वीज मिटर देण्यात येत आहे.मंडप तयार करताना त्याचा सर्वसामान्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलीस विभागाकडून मंडळांना करण्यात आल्या आहेत. मंडळाच्या देवीच्या मिरवणुकीचा मार्ग जुनाच ठेवावा, त्या बदल करून नये, अशा सूचना प्रशसनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या नियमानुसार जिल्ह्यातील मंडळांचे काम सुरू आहे. कृष्णनगर येथील गाडगे महाराज मंदिराशेजारी असलेल्या दूर्गा मंडळाने केलेला देखाचा यंदा आकर्षण ठरणार आहे. तर आर्वी नाका परिसरातील व शास्त्री चौक परिसरातील मंदिर लक्षवेधी ठरणार आहे. शिवाय बाजार परिसरात करण्यात आलेली रोषणाई डोळे दिपवणारी ठरणारी आहे. या व्यतिरिक्त शहरातील देवींच्या मर्तीही आकर्षणाचे केंद्र ठरणाऱ्या आहेत.