शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे काम रखडल्याने वाहतुकीचा पचका

By admin | Updated: July 28, 2016 00:37 IST

आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेनजीकच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडले आहे.

प्रशासनाची उदासीनता : सहा महिन्यांचे काम नऊ महिन्यांवर जाण्याची शक्यता वर्धा : आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेनजीकच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडसर निर्माण झाला आहे. पुलाच्या बांधकामामुळे रस्त्यावर डायव्हर्जन दिल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. पावसामुळे पाणी साचून रस्त्याला खड्डे पडले आहे. पुलाच्या रखडलेल्या बांधकामामुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. वाहतुकीचा पचका हा प्रकार नित्याचाच झाला आहे. या मार्गावर असलेल्या मुख्य नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. बांधकाम विभागामार्फत सदर काम करण्यात येत आहे. याकरिता सहा महिन्यांचा कालावधी प्रस्तावित होता. बांधकाम करण्याकरिता आर्वी मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. सदर मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. जडवाहणे, प्रवासी वाहतूक तसेच शाळकरी मुले, कर्मचारी यांची सतत ये-जा सुरू असते. या मार्गावर मंगल कार्यालये गर्दी जास्त असते. एकेरी वाहतुकीमुळे वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण जात आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. पुलाच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात जागा नाही. त्यामुळे या भागात पाणी साचते. सातत्याने पाणी साचल्यामुळे रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्यातच मंगळवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे येथे पाणी साचून तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे रस्त्यावर खोल खड्डे पडले असून रस्ता उखडला आहे. मध्यंतरी बीएसएनएलने केबल टाकण्याचे काम केले. याकरिता रस्ता खोदला. मात्र केबल नाली व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने रस्त्यावर मधोमध उंचवटे तयार झाले. वाहन काढणे जिकरीचे झाले आहे. रस्त्याचे बांधकाम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी) नागरिक बांधकाम विभागावर धडकले नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडल्याने आधीच वाहतुकीचा पचका झाला आहे. त्यातच मंगळवारी रात्री तासभर झालेल्या दमदार पावसामुळे आसपासच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यात अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे या परिसरातील महिला बुधवारी बांधकाम विभागावर धडकल्या. यावेळी त्यांनी पुलाचेर बांधकाम त्वरित करावे अशी मागणी लावून धरली. हा प्रकार नित्याचाच झाल्याचेही महिलांनी सांगितले. बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. पण पावसामुळे काम बंद ठेवण्यात आले आहे. कामाचे स्वरूप पाहता याला आणखी तीन महिन्यांचा कालावधी ंलागू शकतो. त्यामुळे सहा ऐवजी नऊ महिन्यात सदर काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. काम लवकर पूर्ण करण्याचाच प्रयत्न आहे. - एम. डब्यू. धांदे, अभियंता.