शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णीमुळे नदी-नाले झाले अरूंद

By admin | Updated: March 16, 2017 00:46 IST

खरांगणा (गोडे) व वघाळा या दोन गावांच्या मध्यातून धाम नदी वाहते. नदीचे पात्र लव्हाळे, वनस्पती आणि बेशरमच्या झाडांनी व्यापले आहे.

नागरिकांच्या आरोग्याला धोका : नदीच्या स्वच्छतेची मागणी सेवाग्राम : खरांगणा (गोडे) व वघाळा या दोन गावांच्या मध्यातून धाम नदी वाहते. नदीचे पात्र लव्हाळे, वनस्पती आणि बेशरमच्या झाडांनी व्यापले आहे. खोलीकरण व स्वच्छता कधी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यासह नागरिक उपस्थित करीत आहेत. नद्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असून याच पाण्याच्या भरवशावर मानवी वस्ती व प्रगती साधली आहे. सकाळी व सायंकाळी नद्यांवर गर्दी राहत होती. सर्व व्यवहार व कामकाज नद्यांच्या माध्यमातून होत होते. नव्या शेती तंत्रज्ञानामुळे शेतीत प्रगती झाली. नवीन पीक व जोमात उत्पादने होऊ लागली. नदीतील जलवाहीनीमुळे हरितक्रांती झाली. बारमाही पिकांमुळे शेतकरी, मजुरांना फायदा होऊ लागला. सोबतच पावसाचे सरासरी प्रमाण कमी होऊ लागले. जमिनीवर पडणारे पाणी नदी, नाल्यातून वाहून जाऊ लागले. वैभवशाली परंपरा जोपासणारी धाम नदी आता उथळ झाली. शेवाळ, जल वनस्पती आणि दोन्ही काठावर बेशरमने अतिक्रमण केले आहे. परिणामी, नदीचे पात्र अरूंद झाले. ठिकठिकाणी खोलगट व उथळ भाग झाल्याने यालाच नदी म्हणावे काय, असा प्रश्न उन्हाळ्यात उपस्थित होतो. या नदीतील खोल भागात अल्प पाणी राहत असल्याने डबक्याचे स्वरूप प्राप्त होते. पुरेसे पाणीच नसल्याने ऊसाचे पीक धोक्यात येते. पाणी शुद्ध राहणे गरजेचे आहे; पण याच नदीत मूर्ती विसर्जन, निर्माल्य, पत्रावळी, द्रोण आदी टाकून ते प्रदूषित करण्यात येते. पुलावरून निर्माल्य टाकणारे दररोजच दृष्टीस पडतात. यात शिक्षितांचे प्रमाण अधिक आहे. धामनदीचे पात्र या ठिकाणी मोठे असून कमी पाण्यामुळे प्रवाह थांबला आहे. रोज येथे मासेमारी करून उपजिविका करणारे आहे. या साहित्यामुळे मात्र पाणी दूषित होत असून याचा परिणाम माशांवर होतो. उन्हाळ्यात नदीपात्र डबक्यासारखे होत असल्याने मासेमारीचा प्रश्न निर्माण होतो. सरकारच्या नद्या खोलीकरण व स्वच्छता उपक्रमांतर्गत धाम नदीचे पात्र खोल करणे गरजेचे आहे. जलस्त्रोतावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. शासनाने धामनदीचे खोलीकरण व रूंदीकरण करावे, अशी मागणी शेतकरी व नागरिक करीत आहेत.(वार्ताहर)