शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

पाणीटंचाई, तुंबलेल्या नाल्यांनी नागरिक त्रस्त

By admin | Updated: June 7, 2016 07:40 IST

जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर झाली असून नाल्यांची सफाई न केल्याने सांडपाणी तुंबले आहे. महागाई वाढत असल्याने

वर्धा : जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर झाली असून नाल्यांची सफाई न केल्याने सांडपाणी तुंबले आहे. महागाई वाढत असल्याने वैद्यकीय उपचारासाठीही खर्च करता येत नाही. विधवा, निराधार महिला-पुरूषांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळत नाही. यासह अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. या सर्व समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी क्रांतीकारी महिला शेतकरी संघटनेने केली. यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना महिलांच्या समस्यांची निवेदने देण्यात आली.जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. कडक उन्हात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिणामी, महिला आजारी पडत आहेत. नाल्यांची सफाईही करण्यात आली नाही. यामुळे सांडपाणी तुंबून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने चिमुकल्यांना विविध आजार जडत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महागाई प्रचंड वाढली आहे. गोरगरीब जनतेला डॉक्टराचा व औषधांचा खर्च करणेही कठीण झाले आहेत. ग्रामीण भागात कृषी आधारित अर्थव्यवस्था असल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. परिणामी, गरीब नागरिक वैतागले आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.विधवा महिलांना निराधार व वृद्ध स्त्री-पुरूषांना श्रावण बाळ योजना त्वरित लागू करावी. वृद्ध स्त्री-पुरूषांच्या मुलांना १०० रुपयांच्या ‘स्टॅम्प पेपरवर’ ‘आम्ही आई-वडिलांना पोसू शकत नाही’, असे लिहून मागितले जाते. हा प्रकार अन्यायकारक आहे. गरीब शेतकरी, मजुरांची मुले बेरोजगार आहे. त्यांना रोजगार दिला तर ती मुले आई-वडिलांना पोसण्यास सक्षम आहे. परित्यक्त्या व अपंगांना शासकय योजनांचा लाभ मिळत नाही. तो त्वरित द्यावा. पुनर्वसित गावांना पट्टे वाटप करावे. बऱ्याच गावांत अद्यापही रस्ते नाही. परिणामी, पावसाळ्यात चिखल तुडवावा लागतो. या समस्या त्वरित सोडवाव्या, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या अध्यक्ष हेमा ठवरे यांनी दिला. मोर्चामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर अडविण्यात आले. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.(कार्यालय प्रतिनिधी)आर्वी पालिकेने १० कोटींच्या कामांची रि-टेंडरिंग करावी - मागणी४आर्वी नगर परिषदेमध्ये दहा कोटींची कोम होऊ घातली आहे. ही कामे आधीच बंद खोलीत १० टक्के दराने (कमिशन घेणे ठरवून) पालिकेच्या राजकीय सत्ताधारी व अधिकाऱ्यांनी संगणमत करून कंत्राटदारांना वाटप केली. यामुळे पालिकेने कामांची रि-टेंडरिंग करावी, अशी मागणी युवा स्वाभिमानने केली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे घालण्यात आले.४आर्वी नगर परिषदेमध्ये परवान्याची नोंद असणे अनिवार्य आहे, असा बेकायदेशीर ठराव घेऊन अट टाकण्यात आली. ई-निविदेच्या ५-७ दिवसांपूर्वीपासून जबाबदार अधिकारी दूरध्वनी बंद करून बेपत्ता झाले. नवीन कंत्राटदारांची नोंद व स्पर्धा होऊ नये, मर्जीतील ठरलेल्या कंत्राटदारांनाच कामे मिळावी, हा त्या मागील उद्देश होता. अनेक नवीन कंत्राटदार कार्यालयात नोंदणीकरिता चकरा मारत होते; पण जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने व दूरध्वनी बंद असल्याने नोंद होऊ शकली नाही. सदर सर्व कामे हातमिळवणी झालेल्या कंत्राटदारांनाच ‘सीएसआर रेट’मध्ये मिळेल, असा सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात आले. यात नगर परिषद, शासन, प्रशासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडेल. यामुळे कामांची रि-टेंडरिंग करावी व बेकायदेशीर अट रद्द करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा स्वाभिमाने निवेदनातून दिला.फुटलेल्या पाईपलाईनचे काम संथगतीने४वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारी पवनार ते वर्धा टाकण्यात आलेली पाईपलाईन आरती चौकात लिक झाली. शुक्रवारी फुटलेल्या या पाईपलाईन दुरूस्तीसाठी तब्बल आठ दिवसांचा कालावधी लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. हे काम वेगाने पूर्ण करीत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी बापू युवा संघटनचे सुरेश पट्टेवार यांनी केली. याबाबत त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ४आरती चौकात पाईपलाईन फुटल्याने शहरातील नागरिकांना भर उन्हात पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. शुक्रवारी ही पाईपलाईन फुटली. सोमवारपर्यंत केवळ पाईपलाईनचा खड्डा करून ठेवला आहे. चार दिवसांत दुरूस्तीची कुठलीही प्रगती नाही. यावरून पाईप बदलण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे दिसते. गुरूवारपर्यंत पाणी पुरवठा होणार नसल्याचे पालिकेने जाहीर केले. वर्धा नगर परिषदेने पाण्यासारख्या मुलभूत प्रश्नाकडे विशेष लक्ष केंद्रीत करून प्रत्येक वॉर्डात टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे होते; पण पालिका उदासिन दिसते. त्वरित पाणी पुरवठा व्हावा म्हणून वेगाने काम करावे, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.