शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पोलिसांच्या सतर्कतेने टळली मालमत्तेच्या वादातून होणारी झडप

By admin | Updated: June 10, 2016 02:18 IST

तालुक्यातील शिरपूर (बोके) येथे शेतीच्या कारणावरून सुरू असलेला वाद मोठ्या भांडणाचे स्वरूप घेणार होता.

१३ जणांना अटक : शिरपूर (बोके) येथील घटनाआर्वी : तालुक्यातील शिरपूर (बोके) येथे शेतीच्या कारणावरून सुरू असलेला वाद मोठ्या भांडणाचे स्वरूप घेणार होता. तत्पूर्वीच, पोलिसांनी मध्यस्थी करून तो वाद सोडविला. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी ेपोलिसांनी १३ जणांना अटक केली. अयुब शहा (४५), शहजाद शहा अमिन शहा (२०) रा. अमरावती, फैजल शहा (१८), नईम शहा (२३), जाकीर शहा (२४), सय्यद जमीर (३०), रियाद शहा (२६) रा. रिद्धपूर, साबीर शहा (३८), सलाम शहा (३०), शारीग शहा (२८), शब्बीर शहा (६३), मतीन अहेमद (३८), अदिम शहा (२९) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. शिरपूर बोके येथील हसन शहा यांच्या वडिलोपार्जीत मालमत्तेतील २४ एकर शेती शिरपूर येथे आहे. त्यांना दोन मुली असून एकीचे नाव महरूबी रा. यवतमाळ तर दुसरी जयरूबी रा. नागपूर असे आहे. अयुब शहा हा त्यांचा मुलगा आहे. सद्यस्थितीत अयुब शहा आणि हसन शहा हे दोघेही जिवंत नाहीत; पण त्यांच्या मालकीची असलेल्या २४ एकर शेतीचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, हसन शहा यांच्या दोन्ही मुली महरूबी व जयरूबी यांनी आपली २४ एकर शेती येथील एका शेतकऱ्याला भाड्याने दिली. अयुब शहाची पत्नी रेहान बी हिने त्यांचा विरोध केला. या दोघी बहिणींचा वाद पाहून सदर शेतकऱ्याने प्रथम तुमचा वाद निकाली काढा आणि नंतरच मी तुमचे शेत करतो, असे सांगितले. हा वाद सुरू असतानाच दोन्ही गटातील सदस्य शेतात एकत्र जमले. त्यांनी शस्त्रासह वाद सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. वादाचे गांभीर्य ओळखून आर्वीचे ठाणेदार शैलेंद्र साळवी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून अमरावती आणि रिद्धपूर येथील नागरिक दुचाकीने पसार होण्याच्या प्रयत्ना होते. ही बाब लक्षात येताच त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात त्यांच्यावर भादंविच्या कलम १४३, १४४, ४७, ४८, ३४९, ४/२५ आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील १३ आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजर केले.प्रकरणाचा तपास ठाणेदार शैलेंद्र साळवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बुध करीत आहे. ग्रामस्थांनी वेळीच माहिती दिली नसती व पोलिसांनी सतर्कता दाखविली नसती शिरपूर येथे मोठी घटना घडली असती.(शहर प्रतिनिधी)