शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे खरडली शेतजमीन

By admin | Updated: July 6, 2016 02:30 IST

गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यातच सोमवारी आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा परिसराला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले.

बांध फुटल्याने शेती जलमय : सात गावांतील १०० च्या वर शेतकऱ्यांचे नुकसानवर्धा/पिंपळखुटा : गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यातच सोमवारी आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा परिसराला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तब्बल दोन तास ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळल्याने सात गावांतील १०० च्या वर शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले. या पावसामुळे ८५ हेक्टरमधील पिकांचे ५० टक्केच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळखुटा परिसरातील शेतजमिनी खरडून गेल्या. कित्येक शेतांचे बंधारे फुटल्याने बियाणे अंकुरण्यापूर्वीच मातीखाली दबले. बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणीची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. वाढोणा येथे पर्जन्यमापक यंत्र आहे. तेथे ३६ मिली पावसाची नोंद घेण्यात आली; पण पिंपळखुटा परिसरात यापेक्षा अधिक पाऊस झाला. तलाठी रजेवर व कृषी सहायक प्रशिक्षणाला गेल्याने शेतकऱ्यांना वेळेत तक्रार देता आली नाही. प्रत्येक शेतात पाणी साचले आहे. तरोडा येथील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. श्यामसुंदर भुतडा यांची विहीर पावसामुळे खचली आहे. वाहतूकही विस्कळीत झाली होती. तरोडा येथे विठ्ठल वाघ यांच्या घराच्या भिंती पडल्या. तरोडा येथे तुकाराम थूल यांच्या शेतात नाल्याचा पूर गेल्याने शेत खरडून गेले. सुरेश ढोले, मंदा गायकवाड, ज्ञानेश्वर धपाट, ओमप्रकाश भुतडा, होरेश्वर कालोकार, गोलू शाहू, भास्कर जाधव यांच्याही शेताचे नुकसान झाले. मंगळवारी नुकसानग्रस्त भागाची कृषी व महसूल विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे.(कार्यालय प्रतिनिधी/वार्ताहर)