शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काहिली करणाऱ्या उन्हामुळे जिल्ह्यातील ‘टायगर’ची प्रादेशिकच्या जंगलाकडे धाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात वर्धा जिल्ह्यातील प्रादेशिकच्या जंगलात ४० ठिकाणी, तर देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेल्या बोर प्रकल्पात २८ मचाणींवरून निसर्गानुभव कार्यक्रम पार पडला. या उपक्रमादरम्यान बोर व्याघ्र प्रकल्पात एकाच दिवशी तब्बल ५३६ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. असे असले तरी बोर व्याघ्र प्रकल्पात निसर्ग तसेच वन्यजीव प्रेमींना व्याघ्र दर्शन झाले नाही. केवळ सहा मचाणींवर वाघाची डरकाळी ऐकू आली.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : यंदाच्या वर्षी मान्सून काही दिवसांपूर्वीच वर्धा जिल्ह्यात दाखल होईल, असे सांगितले जात असले तरी सध्या जिवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे मनुष्यासह विविध प्राणी मुटाकुटीस आले आहेत. अशातच जिवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे वाघांनी आपला मोर्चा थेट प्रादेशिकच्या जंगलाकडे वळविला असून, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या वन्यप्राणी गणनेनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात वर्धा जिल्ह्यातील प्रादेशिकच्या जंगलात ४० ठिकाणी, तर देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेल्या बोर प्रकल्पात २८ मचाणींवरून निसर्गानुभव कार्यक्रम पार पडला. या उपक्रमादरम्यान बोर व्याघ्र प्रकल्पात एकाच दिवशी तब्बल ५३६ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. असे असले तरी बोर व्याघ्र प्रकल्पात निसर्ग तसेच वन्यजीव प्रेमींना व्याघ्र दर्शन झाले नाही. केवळ सहा मचाणींवर वाघाची डरकाळी ऐकू आली. पण, याच दिवशी प्रादेशिकचे जंगल परिक्षेत्र असलेल्या आर्वी वनपरिक्षेत्रातील दोन मचाणींवर निसर्ग तसेच वन्यजीव प्रेमींना वाघाचे दर्शन झाले. उन्हाळ्याच्या दिवसांत टायगर प्रादेशिकच्या जंगलाकडे धाव घेत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

या परिसरात झाले व्याघ्र दर्शन-    आर्वी वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १८८ व कक्ष क्रमांक १८५ या परिसरात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मचाणींवर असलेल्या वन्यजीव प्रेमींना वयस्कर वाघांचे दर्शन झाले. पाणवठ्यावर अचानक वाघ आल्याने मचाणींवरील निसर्गप्रेमींची काही काळाकरिता भांबेरीच उडाली असली तरी व्याघ्र दर्शनामुळे त्यांचा हा दिवस सफल झाल्याचे सांगण्यात आले.

आठ बिबट्यांचे झाले दर्शन-    प्रादेशिकच्या जंगलातील गणनेसाठी उभारण्यात आलेल्या मचाणींवर राहून वन्यजीवप्रेमींनी आठ बिबट्यांची नोंद घेतली. यात सहा वयस्कर बिबट्यांचा समावेश आहे. हिंगणी, खरांगणा या वनपरिक्षेत्रात अनुक्रमे चार व दोन, तर कारंजा आणि समुद्रपूर वनपरिक्षेत्रात प्रत्येकी एक बिबट्याचे दर्शन झाले.

 

टॅग्स :Tigerवाघ