लोकमत न्यूज नेटवर्क तळेगाव (श्या.पंत.) : नजीकच्या जंगलव्याप्त भागाकडून वाहत येणाऱ्या धर्मा नाल्याचे येथील पात्र गाळामुळे बुजले आहे. या नाल्याचे पात्र साफ करण्याची मागणी असून पावसाळ्यात नाल्याला येणाऱ्या पुरामुळे ही बाब धोकादायक ठरु शकते. पुरासोबत आलेल्या गाळामुळे नाल्याचे पात्र सपाट झाले आहे. काही ठिकाणी तर नाल्याचा प्रवाहच बदलला आहे. त्यामुळे नाल्या काठावरील शेतात पुराचे पाणी घुसून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नाल्याचे खोलीकरण करण्याची येथील शेतकऱ्यांनी मागणी आहे. धर्मा नाला जंगलातून वाहत येत असून या नाल्याला परिसरातील सर्व लहान नाले मिळतात. त्यामुळे पावसाळ्यात या नाल्याला पुर येतो. नाल्यात मुबलक पाणी असते. पुरासोबत वाहत आलेल्या गाळाने नाल्याचे पात्र बुजले. यातील गाळ उपसण्यात आला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाल्याकाठावरील शेतांना पुराच्या पाण्याचा धोका आहे. यापूर्वी काही शेतकऱ्यांचे शेतच पुराच्या पाण्यात खरडून गेल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे या नाल्याचे पावसाळ्यापूर्वी खोलीकरण करण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
धर्मा नाल्याचे पात्र बुजल्याने पुराचा धोका
By admin | Updated: May 18, 2017 00:36 IST