शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कर बुडव्यांवर पालिकेचा बडगा

By admin | Updated: February 12, 2017 00:59 IST

पालिकेंतर्गत येत असलेल्या अनेक व्यवसायिकांनी त्यांच्या मालमत्तेचा कर पालिकेत अदा केला नाही.

अनेक दुकाने केली सील : काहींचा कापला पाणी पुरवठा वर्धा : पालिकेंतर्गत येत असलेल्या अनेक व्यवसायिकांनी त्यांच्या मालमत्तेचा कर पालिकेत अदा केला नाही. अशा मालमत्ताधारकांना पालिकेने नोटीसही बजावले; मात्र त्यांच्याकडून कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने पालिकेच्यावतीने मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात आली. या कार्यवायीनंतर काही करबुडव्यांनी करावा भरणा केल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. पालिकेच्यावतीने कारवाईचा बडगा येताच अनेकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकीत करचा भरणा पालिकेत येत केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. शहरातील मालमत्ताधारकांना कराचे देयक व कर भरणा करण्याबाबत नोटीस देवून सुध्दा त्यांच्याकडून भरणा करण्यात आला नाही. यामुळे विशेष कर वसुली पथकाद्वारे थकीत कर असणाऱ्यांची मालमत्ता जप्तीची व पाणी पुरवठा कपातीची कार्यवाही पालिकेच्यावतीने करण्यात आली. यात बाजार परिसरातील वॉर्ड १७ मधील चंदा जाजोदिया, निकीता साडी सेंटर यांच्याकडे कर थकीत असल्याने त्यांच्या या मालमत्तेला सील ठोकण्यात आले. सील ठोकजाच त्यांच्याकडून कराचा भरणा करण्यात आल्याने ठोकलेले सील उघडण्यात आले. वॉर्ड क्र. ११ मधील मोहन अड्याळकर यांनी कराचा भरणा न केल्यामुळे त्यांच्या मालमत्तेला सील लावण्यात आले आहे. वॉर्ड क्रमांक १० मधील मालमत्ता धारक एन. झेडे तायडे यांनी कराचा भरणा न केल्यामुळे त्यांच्याकडील पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला. पालिकेच्या महाराणा प्रताप संकुलातील मधील यशवंत रामटेके यांनी कर व गाळे भाडे न भरल्यामुळे गाळ्याला सील लावण्यात आले आहे. ही कार्यवाही नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, कर पथकातील प्रमुख रवींद्र जगताप, कर अधीक्षक गजानन पेटकर, एजाज फारूकी, विजय किनगावकर, अविनाश मरघडे, मुक्कीम शेख, अशोक गायकवाड करसंग्राहक निखील लोहवे, यांची उपस्थिती होती. सक्तीने कर वसुली, मालमत्ता जप्तीची व नळ कपातीची कार्यवाही सतत सुरू राहणार आहे. मालमत्ता जप्ती व नळ कपाती सारखी अप्रिय कार्यवाही टाळण्याकरिता मालमत्ता धारकांनी थकीत करावा भरणा करावा असे आवाहन वर्धा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.(प्रतिनिधी)