शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यामुळे नदी पात्र होतेय दूषित

By admin | Updated: April 6, 2015 02:03 IST

बोरधरण प्रकल्पापासून वाहत असलेल्या नदीचा प्रवाह उन्हाळ्याच्या दिवसात बंद होतो़ असे असले तरी गावोगावचे सांडपाणी

नाल्यांचा अभाव : नदी स्वच्छता अभियानाकडेही दुर्लक्षचसेलू : बोरधरण प्रकल्पापासून वाहत असलेल्या नदीचा प्रवाह उन्हाळ्याच्या दिवसात बंद होतो़ असे असले तरी गावोगावचे सांडपाणी गावालगत नदीच्या पात्रात साचत आहे़ यामुळे बोर नदीचे पात्र दूषित होत आहे. नाले नाही, जनजागृतीचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नद्यांचे पात्रच धोक्यात आल्याचे चित्र आहे़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी स्वच्छता अभियानच हाती घेणे गरजेचे झाले आहे़बोर नदीच्या काठावर हिंगणी, मोही, किन्ही, घोराड, सेलू, बेलगाव, धानोली आदी गावे आहेत़ याच नदीवर हिंगणी ते सेलूपर्यंत अनेक कोल्हापुरी बंधारे आहेत़ असे असले तरी दोनच बंधाऱ्यांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी अडविले जाते़ हिवाळ्याच्या दिवसांपासूनच नदीचा प्रवाह मंदावतो़ उन्हाळ्याच्या दिवसांत तो प्रवाह पूर्णत: बंद होतो. अशावेळी गावांतून वाहणारे सांडपाणी नदीच्या खळग्यात साचले जाते. नदीच्या काठावर असलेल्या सर्वच गावांतील सांडपाण्याच्या नाल्या नदीच्या दिशेने वाहत असल्याचे दिसते़ नव्यानेच झालेल्या सेलू नगर पंचायत व या गावाचा वाढता विस्तार पाहता नदीचे सौंदर्य जपणे गरजेचे झाले आहे़ ऐन गावाशेजारी असलेल्या बंधाऱ्यात गावातील संपूर्ण सांडपाणी साचले असून नदीचे पात्र बेशरमच्या झाडांनी वेढले आहे. नदी काठावर आठवडी बाजार भरत असून विक्रेतेही भाजीपाला ताजातवाणा राहावा म्हणून नदीचे पाणी शिंपडत असतात. मोही व किन्ही येथील सांडपाणी गावालगतच साचत असून विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे हीच परिस्थिती आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या शासनस्तरावर नद्यांचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे़ बोर नदी पात्रही दूषित होण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे़ स्थानिक व जिल्हा प्रशासनाने या दृष्टीने पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे़(शहर प्रतिनिधी)बेशरमने वेढले नदीचे पात्र; त्या बंधाऱ्याकडेही दुर्लक्षनदीमध्ये वाढलेल्या बेशरमच्या झाडांनी पात्राला पूर्णपणे वेढले आहे़ दिवसेंदिवस यात वाढच होत असल्याचे दिसते़ ही झुडपे कापणे गरजेचे झाले आहे़गत १० वर्षांपासून घोराड गावालगत असलेल्या दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांत पाणीच अडविले जात नाही़ या बंधाऱ्यांकडे लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे़