शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दप्तरी गटाच्या हेकेखोरीमुळेच भाजपाचे कॉँग्रेसला समर्थन

By admin | Updated: December 4, 2015 02:15 IST

येथील नगर पंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडणूक झालेल्या रस्सीखेचमुळे संपूर्ण जिल्हाभर चर्चिल्या गेली.

पत्रकार परिषद : उपनगराध्यक्ष हांडे यांचा खुलासासेलू : येथील नगर पंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडणूक झालेल्या रस्सीखेचमुळे संपूर्ण जिल्हाभर चर्चिल्या गेली. यात दप्तरी गटाकडून होत असलेल्या हेकेखोरपणामुळे अगदी वेळेवर कॉँग्रेस पक्षाला समर्थ देऊन सत्तेत सहभागी व्हावे लागले, असा गौप्यस्फोट सेलू नगर पंचायतीचे उपाध्यक्ष चुडामण हांडे यांनी पत्रकार परिषदेतून केला. हांडे यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. हांडे म्हणाले, आजही भाजपाचा आहे, कालही होतो, असा विश्वास देवून दप्तरी यांना भाजप गटाने समर्थन घ्यावे असा पक्षश्रेष्ठींचा हट्ट होता. भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, तालुका अध्यक्ष राणा रणनवरे व ज्येष्ठ नेते मनोहर सोमनाथे यांची आग्रही भूमिका होती; परंतु वाटाघाटीत दप्तरी यांनी आम्हाला वारंवार अपमाणित केले तसेच निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या विरोधात १७ उमेदवारांचे आव्हान उभे केले. त्यामुळे शहरात भाजपला स्पष्ट बहुमत मिळविता आले नाही. नगर पंचायतच्या राजकारणात भाजपला सहभागी करण्यासाठी व पक्षवाढीच्या कार्यासाठी आवश्यक बाब म्हणून हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला असेही यावेळी हांडे म्हणाले. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या दिवशी आम्ही दप्तरी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेकरिता चर्चा केली असता त्यांनी स्पष्ट शब्दात ‘तुमची गरज नाही, माझी युती जयस्वाल यांच्या सोबत झाली’, असे खडे बोल सुनावून अपमानित केले व चर्चा न करताच निघून गेल्याचे म्हटले आहे. शेवटी आमच्यापुढे कोणताही पर्याय शिल्लक नसताना कॉँग्रेसचे नेते डॉ. राजेश जयस्वाल यांनी आम्हाला घरी येवून सत्तेसाठी आमंत्रित केले व आम्ही सुध्दा पक्षाचे हित लक्षात घेत निसंकोच समर्थन दिल्याचे हांडे यावेळी म्हणाले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कॉँग्रेसला समर्थन देतेवेळी झालेल्या वाटाघाटीत सहकाऱ्यांनी आगामी अडीच वर्षांनंतर भाजपाचा नगराध्यक्ष असेल हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जयस्वाल यांनी तो मुद्दा तत्वत: मान्य केला. निवडणूक निकालानंतर झालेली त्रिशंकु परिस्थिती पाहता सेलू नगराच्या विकासाला प्राधान्य देत कॉँग्रेसचे डॉ. राजेश जयस्वाल यांच्यासोबत असलेले राजकीय मतभेद विसरून युती करण्याचा निर्णय सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून घेतल्याचे हांडे म्हणाले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर सोमनाथे, भाजपाचे तालुका सरचिटणीस जीवन सुर्वे, हिरामण हांडे, नगरसेवक सावित्री उईके, सनी खोडे व केळझरचे उपसरपंच फारूक शेख उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)