शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून पर्जन्यमान केंद्र आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:07 IST

शासनाने तालुकास्थळी पावसाळ्यातील पाण्याची सरासरी मोजण्यासाठी पर्जन्यमान केंद्र निर्माण केले;....

ठळक मुद्देपावसाळ्यात पर्जन्यमानाचे मोजमाप नाही : एक खराब झाल्यावर दुसरेही बसविले

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : शासनाने तालुकास्थळी पावसाळ्यातील पाण्याची सरासरी मोजण्यासाठी पर्जन्यमान केंद्र निर्माण केले; पण याची देखभाल, दुरूस्ती करणारी यंत्रणाच नाही. यामुळे दहा वर्षापासून हे केंद्र आजारी अवस्थेत आहे. परिणामी, शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. यासाठी त्वरित यंत्रणा उभी करून पर्जन्यमान केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.दहा वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागात पर्जन्यमान केंद्र निर्माण करण्यात आले होते. यासाठी पर्यायी अधिकारीही देण्यात आले होते. दोन वर्षे येथे अचूक आकडेवारी मिळत होती. यानंतर मात्र यातील यंत्र कुलूपबंदच असल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे देखभाल व दुरूस्ती करण्यात आली नसल्याने सदर केंद्र बंद पडले आहे. केंद्राच्या सभोवताल तयार केलेल्या कुंपणाला लोखंडी गेट लावले होते. त्याला असलेले बंद कुलूप पूर्णपणे जंगलेले आहे; पण त्याची दुरूस्ती व पाहणी कोणत्याही अधिकाºयाने आजपर्यंत केली नाही. शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका येथे बसत आहे.यानंतर दुसरे पर्जन्यमान केंद्र त्याच्या शेजारीच उभारण्यात आले. त्याच्यासमोर असलेल्या फलकावर महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र महाराष्ट्र शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.लि. यांचा सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प, अशा पद्धतीचा मजकूर लिहिलेला आहे. याही गेटच्या कुलूपाला दोन वर्षांपासून जंग चढला आहे. यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. शेतकºयांना वेधशाळेची अचुक माहिती मिळाल्यास पाऊस कधी येणार, किती होणार या सर्व बाबींवर पीक परिस्थिती अवलंबून असते. यामुळे लाखो रुपये खर्च करून त्याचे फलित मिळणार नसेल तर उपयोग काय, हा प्रश्नच आहे. शासनाने हवामान व पर्जन्यमान केंद्राचे धोरण स्पष्ट केले. दोन्ही केंद्र एकाच ठिकाणी असल्याने तालुकानिहाय पावसाची आकडेवारी तंतोतंत मिळण्यास मोलाची मदत होते.दोन वर्षांपासून दुसºया केंद्राचेही कुलूप बंदचतहसील कार्यालय परिसरात दहा वर्षांपूर्वी लावण्यात आलेले पर्जन्यमापक केंद्र बंद आहे. यामुळे त्यातील यंत्रही खराब झाले. परिणामी, दोन वर्षांपूर्वी दुसरी यंत्रणा उभारण्यात आली; पण दोन वर्षांपासून त्या यंत्रणेचेही कुलूप उघडण्यात आलेले नाही. यामुळे गेटवरील कुलूप गंजले असून पावसाचे मोजमापच घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. शेतकºयांनाही अचुक पावसाचा अंदाज कळत नाही. परिणामी, पिकांचे नियोजन करता येत नाही. ही यंत्रणा सुधारण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.पाहणीही नाहीदहा वर्षांपासून बंद असलेल्या पर्जन्यमान केंद्राची साधी पाहणी करण्याचे सौजन्यही अधिकाºयांनी दाखविले नाही. यामुळे खर्च व्यर्थ गेल्याचेच दिसून येत आहे.