शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रेती उपस्यामुळे भाविकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:32 IST

रेतीघाटांनी जिल्ह्यातील नद्या धोक्यात आणल्या आहेत. सर्वाधिक घाट जिल्ह्यात वर्धा नदीवर आहेत. याच नदीवरील सातेफळ घाटातून सध्या रेतीचा अतिरेकी उपसा सुरू आहे. सदर घाटधारक हद्द सोडून कोटेश्वर येथील घाटापर्यंत बोटी आणत असल्याने भाविकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसातेफळ रेतीघाटातील प्रकार : हद्द सोडून कोटेश्वर घाटाकडे बोटीने उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रेतीघाटांनी जिल्ह्यातील नद्या धोक्यात आणल्या आहेत. सर्वाधिक घाट जिल्ह्यात वर्धा नदीवर आहेत. याच नदीवरील सातेफळ घाटातून सध्या रेतीचा अतिरेकी उपसा सुरू आहे. सदर घाटधारक हद्द सोडून कोटेश्वर येथील घाटापर्यंत बोटी आणत असल्याने भाविकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.रेती घाटातून जेसीबी, पोकलॅन, बोटीद्वारे रेतीचा उपसा करता येत नाही. असे असले तरी हल्ली प्रत्येक घाटावर या साहित्याचा वापर केला जात असल्याचे वास्तव आहे. सध्या वर्धा नदीवरील सातेफळ रेतीघाटातून रेतीचा उपसा केला जात आहे. या रेतीघाटाची हद्द एक किमी आहे. असे असले तरी सदर घाटधारक तब्बल पाच किमीपर्यंतच्या रेतीचा उपसा करीत असल्याचे समोर आले आहे. कोटेश्वर देवस्थानाचे आगळे महत्त्व असल्याने अनेक भाविक येथे पुजेसाठी येतात. शिवाय उत्तरवाहिनीमध्ये स्रान करण्यासाठीही येतात. राखड शिरविणे तथा दसव्यासाठी येणारे नागरिकही नदी पात्रामध्ये स्रानासाठी जातात. काही युवक नित्यनेमाने पोहण्याचा आनंद लुटण्याकरिता येतात. कोटेश्वर येथे वर्धा नदी उत्तरवाहिनी असल्याने पाण्याचा फारसा ओढा नसतो. यामुळे जीविताला धोका होण्याची शक्यता कमी असते; पण सध्या रेतीघाटधारक अतिरेकी उपसा करीत असल्याने भाविकांच्याच जीविताला धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.सातेफळ येथील रेतीघाटातून रेती काढत असतानाच बोटी कोटेश्वर येथील गंगाघाटापर्यंत आणल्या जात आहेत. कोटेश्वरजवळील रेतीचा उपसा केला जात असल्याने नदी पात्रामध्ये खोलवर खड्डे पडले आहेत. हा प्रकार नदीत आंघोळ करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो. आजपर्यंत सुरक्षित पात्र म्हणून ओळख असलेल्या कोटेश्वर येथे आता रेतीच्या उपस्यामुळे अनुचित घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. वास्तविक, घाटधारकाने आपल्या हद्दीतून रेतीचा उपसा करणे गरजेचे होते; पण पैशाच्या हव्यासापोटी हद्द सोडून रेतीचा उपसा केला जात असल्याचे दिसून येत आहे. यात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडविला जातो. हा प्रकार मागील काही वर्षांत ‘कॉमन’ झाल्याचेच पाहावयास मिळत आहे. महसूल प्रशासनाने याची दखल घेत कोटेश्वर येथील गंगाघाटाकडून रेती काढणाºया घाट धारकावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.नदी पात्रामध्ये जीवघेणे खड्डेकोटेश्वर देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. येथे वर्धा नदी उत्तरवाहिनी असल्याने कोटेश्वरचे पौराणिक महत्त्व आहे. या मंदिरात दर्शनाकरिता दूरवरून भाविक येत असतात. शिवाय उत्तरवाहिनी असल्याने येथील पूजाविधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळेच राखड शिरविणे, दसवा यासह अन्य धार्मिक विधींकरिता भाविक कोटेश्वरला येतात. शिवाय पवित्र महिन्यांमध्ये उत्तरवाहिनीत स्रानाकरिताही भाविक येत असतात. आता सातेफळ घाटधारक कोटेश्वर येथील गंगाघाटाजवळच बोटीद्वारे रेती काढत असल्याने पात्रात खड्डे पडले आहेत. हे खड्डे जीवघेणे खड्डे अनुचित घटनांना निमंत्रण देणारे ठरत आहे.सातेफळ येथील रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला आहे. या घाटधारकाने नदीपात्रातून थेट बोटींद्वारे रेतीचा उपसा सुरू केला आहे. शिवाय नदीच्या दोन्ही दिशेकडून रेतीचा उपसा केला जात आहे. हद्द एक किमी असताना पाच किमीतील रेती काढली जात आहे. यातही कोटेश्वर येथील घाटापर्यंत रेती उपसली जात असल्याने भाविकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे.- मनोज वसू, माजी पं.स. सभापती, देवळी.शिरजोरीपुढे नागरिक हतबलसदर रेती घाटधारकांना अनेक नागरिकांनी कोटेश्वर गंगाघाटाजवळून रेतीचा उपसा करू नका, अशी विनंती केली. शिवाय अनेकांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला; पण घाटधारक तथा त्यांचे कामगार नागरिकांशी वाद घालून शिरजोरीने रेतीचा उपसा करतात. यामुळे नागरिकही हतबल झाले आहेत.