शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॅश व्हॅन लूट प्रकरणातील शासकीय युक्तीवाद संपुष्टात

By admin | Updated: June 18, 2017 00:38 IST

अकोला येथून नागपूरकडे रोकड घेऊन जाणारे वाहन नागपूर-अमरावती मार्गावरील ठाणेगाव शिवारात अडवून चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या लुटली होती.

ठाणेगावातून लुटले होते २.३६ कोटी सोमवारपासून आरोपींकडील युक्तीवाद लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अकोला येथून नागपूरकडे रोकड घेऊन जाणारे वाहन नागपूर-अमरावती मार्गावरील ठाणेगाव शिवारात अडवून चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या लुटली होती. यातील २.३६ कोटींची रोकड लंपास करण्यात आली होती. हे बहुचर्चीत कॅश व्हॅन लूट प्रकरण न्यायप्रविष्ट असून यातील शासकीय युक्तीवाद शनिवारी संपुष्टात आला. सोमवारपासून आरोपींचे वकील त्यांची बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अकोला येथून रोकड घेऊन निघालेली कॅश व्हॅन ७ मार्च २०१३ रोजी नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात काही अज्ञात चोरट्यांनी अडविली. वाहनातील २ कोटी ३६ लाख ५० हजारांची रोकड चोरट्यांनी यशस्वीरित्या पळविली होती. सदर प्रकरणी तक्रार प्राप्त होताच कारंजा (घा.) पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सदर प्रकरणातील आरोपी चंद्रशेखर सुब्रमण्यम मुदलीया, सल्लू कुमार उर्फ सेलवा कुमार (काऊंडर), रसीम शेख, शैलेश उर्फ रवी मसराम, सचिन श्रीवास्तव, सय्यद मकसूद अली, शेख मुशताख उर्फ समीर शेख हबीब, रेहान बेग, शाकीर हुसेन, रवींद्र उर्फ रवी माडेकर, मंगल उर्फ सत्यप्रकाश यादव, प्रशांत वाघमारे, रवी उर्फ छोटू बागडे, मोहन सादीक, सुलेमान सूर्या, नोबीन अहमद खान, शेख अलताफ, वैभव उर्फ पिंटू बिजेवार, साधना इटले, अश्वितसिंग उर्फ सोनू चव्हाण, पंकज उर्फ गब्बर कनोजे, मोहम्मद तबसीन, मोहम्मद शमीम, विजय उर्फ विजू सोनेकर यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते. सदर आरोपींकडून पोलिसांनी जवळपास १ कोटी ९० लाख रुपयांची रोकड व सोन्याचे प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाचे एकूण तीन बिस्कीट जप्त केले होते. तपासात आरोपींनी नियोजनबद्ध कट रचल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. हे प्रकरण न्यायदानासाठी जिल्हा सत्र न्यायालय तीन मध्ये असून आतापर्यंत जिल्हा सत्र न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांच्या समक्ष शासकीय ५० तर आरोपींच्या बचावाचे दोन साक्षदार तपासण्यात आले आहेत. शनिवारी या प्रकरणातील शेवटचा शासकीय युक्तीवाद संपुष्टात आला आहे. आता सोमवारपासून आरोपींचे वकील आरोपींच्या बचावासाठी युक्तीवाद करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर प्रकरणामध्ये शासनाकडून अ‍ॅड. व्ही.आर. घुडे यांनी न्यायालयात प्रभावीपणे युक्तीवाद केला आहे.