शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

संकुलाअभावी क्रीडा विकासाला खीळ

By admin | Updated: June 29, 2015 02:34 IST

क्रीडा विकास धोरणांतर्गत तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

वर्धा: क्रीडा विकास धोरणांतर्गत तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्धा जिल्ह्यात मात्र हे धोरण कुचकामी ठरत असल्याचेच दिसत आहे. देवळी वगळता इतरत्र कुठलेही संकुल खेळाडुंकरिता उपयोगात नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात कुठे जागेचा तर कुठे लोकप्रतिनिधीच्या तारेखेअभावी लोकार्पणाअभावी संकुल निरुपयोगी ठरत आहे. एका क्रीडा संकुलाकरिता एक कोटी रुपये शासनाकडून मंजूर होत आहे. हा निर्णय झाला त्या वेळी ती रक्कम योग्य होती. बदलत्या काळात गरजा व खेळांचे स्वरूप बदल्याने या रकमेत सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल उभारणे शक्य होत नाही. ज्या ठिकाणी क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरू आहे, तिथे सर्व सुविधा मिळतीलच हे सांगणे कठीण आहे. क्रीडा धोरणानुसार या संकुलात बॅटमिंटन खेळण्याकरिता तयार करण्यात येणार असलेल्या मैदानालाच सुमारे ५५ लाख रुपये लागतात. यामुळे उर्वरीत रकमेत इतर खेळाच्या सुविधा देणे शक्य होत नाही.जिल्ह्यात केवळ देवळी येथेच क्रीडा संकुल पूर्ण झाले आहे. त्याचे लोकार्पण झाले असून त्यात खेळ सुरू आहेत. सेलूत क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे; मात्र लोकप्रतिनिधीची तारीख मिळत नसल्याने त्याचे लोकार्पण झाले नाही. यामुळे येथील क्रीडा संकुल तालुक्यातील खेळाडुंकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. आर्वी व आष्टी (शहीद) तालुक्यात बांधकाम सुरू आहे. वर्धा, कारंजा (घाडगे) व समुद्रपूर येथे क्रीडा संकुलाकरिता जागा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. हिंगणघाट तालुक्यात जागा मंजूर होत त्याचे बांधकाम सुरू झाले; मात्र जागेबाबत वाद उत्पन्न झाल्याने बांधकाम रखडले आहे. यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू देण्यात आघाडीवर असलेल्या या तालुक्यातील खेळाडूंचा हिरमोड होत आहे. हा वाद सोडविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने लक्ष देत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. वर्धेत असलेली स्थिती राज्यात आहे. यामुळे क्रीडा विकासाच्या धोरणाकरिता असलेल्या क्रीडा समितीत बदल करण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार आमदार समितीचे अध्यक्ष राहणार आहे. तर तालुका क्रीडा अधिकारी वा क्रीडा अधिकारी सचिव राहणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला मात्र सदस्य म्हणून समितीत राहावे लागणार आहे. यामुळे क्रीडा विकासात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची बघ्याची भूमिका असणार असल्याचे समोर येत आहे. याचा विपरित परिणाम जिल्ह्याच्या क्रीडा धोरणारवर होणार आहे.(प्रतिनिधी)