शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निधी नसल्याने पुलाची दुरूस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:42 IST

वर्धा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गोजी ते येरणगाव या रस्त्यावर पूल खचलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे यामार्गावरून रहदारी बंद झाली आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्वला पांडूरंग देशमुख यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, बांधकाम विभाग यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली होती.

ठळक मुद्देगोजी-येरणगाव रस्त्यावर पूल खचला : अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गोजी ते येरणगाव या रस्त्यावर पूल खचलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे यामार्गावरून रहदारी बंद झाली आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्वला पांडूरंग देशमुख यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, बांधकाम विभाग यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद वर्धा यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी पूल दुरूस्तीसाठी हेड नाही आणि असे सांगून आम्ही या पूलाच्या दुरूस्तीचे काम करू शकणार नाही असे सांगितले. त्यांनी जिल्हा नियोजन व विकास अधिका ऱ्यांकडे निधीची व्यवस्था आहे. ते हे काम करू शकतात अशी माहिती उज्वला देशमुख यांना दिली. ज्या रस्त्यांवरून शेकडो गावातील नागरिकांची रहदारी आहे. अशा रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषद बांधकाम निधीची तरतूद करू शकत नसेल तर या ठिकाणी भविष्यात होणाºया अपघाताची जबाबदारी कुणाची असा सवाल देशमुख यांनी केला आहे. पुलाच्या दुरूस्तीसाठी जर निधी उपलब्ध होत नसेल तर अशा व्यवस्था काय कामाच्या असा प्रश्न उज्जवला देशमुख यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषद सदस्यांना अशा कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरची वाहतूक बंद ठेवण्याची वेळ आता आली आहे. येरणगाव गोजी परिसरात नागरिकांना रहदारी बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असेही त्यांनी म्हटले आहे.कात्री चौरस्ता रस्त्याची दैनाकात्री ते कात्री चौरस्ता रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने खड्ड्यांमध्ये पाणी जमा होऊन डबके तयार झाले आहे. येथून वाहन चालवितांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. कात्री येथील रस्त्याचे काम मागील एक दशकापूर्वी करण्यात आले होते. परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे या रस्त्याला अल्पावधीच खड्डे पडले. रस्त्यावरून चारचाकी वाहने तर सोडा परंतू दोनचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग निंद्रावस्थेत आहे. भाजप पदाधिका ऱ्यांनी या रस्त्याच्या दुरस्ती कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्याच्याविषयी कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता दुरस्त करावा अशी मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा