शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कार्लेकरांच्या बंडाळीने देशमुख व कांंबळे गटात दरी

By admin | Updated: July 7, 2016 02:12 IST

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस प्रणित सहकार गटाने रमेश खंडागळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. श्याम कार्लेकर यांनी बंड पुकारत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती

अविश्वासाच्या हालचाली : बाजार समिती निवडणुकीचे पडसादवर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस प्रणित सहकार गटाने रमेश खंडागळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. श्याम कार्लेकर यांनी बंड पुकारत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदासाठीचे आपले नामांकन कायम ठेवले. यात ते निवडून आले. परिणामी, सुरेश देशमुख व आ. रणजीत कांबळे गटात दरी निर्माण झाली आहे. देशमुख गट म्हणतो, रणजीत कांबळे गटाने आघाडी धर्म पाळला नाही, तर कांबळे गट म्हणतो, देशमुख गटच फुटला. यावरून आता दोन्ही गटात बेबनाव निर्माण झाला असल्याचे चित्र आहे.कुणी विश्वासघात केला, कुणी आघाडी धर्म पाळला नाही, हे सिद्ध करण्यासाठी सत्तेसाठी आघाडीत बंडखोरी करून सभापतिपदी विराजमान झालेले श्याम कार्लेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणावा, यासाठी राष्ट्रवादी सदस्यांकडून गट प्रमुख सुरेश देशमुख यांना साकडे घालणे सुरू आहे. या दृष्टीने देशमुख गटाने हालचालीही सुरू केलेल्या आहेत. यासाठी रणजीत कांबळे गटाची भूमिका काय राहिल, यावरच सभापतिपदाच्या निवडणुकीत काय घडले, यावरुन पडदा उठणार असल्याचे बोलले जात आहे.सुरेश देशमुख आणि आ. रणजित कांबळे यांच्या पुढाकारात सहकार गटाची निर्मिती झाली. सभापती पदाच्या निवडणुकीत कांबळे गट आपण प्रामाणिक राहुन सहकार गटाच्या रमेश खंडागळे यांना मतदान केल्याचे सांगत आहे. परंतु बंडखोर कार्लेकर निवडून आले. देशमुख गटाने कार्लेकर यांच्यावर विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर अविश्वास आणण्याच्या हालचालीही सुरू केलेल्या आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ. रणजित कांबळे गटाचे पाच संचालक आहे. हे पाचही संचालक आघाडीत ठरल्याप्रमाणेच रमेश खंडागळे यांना मतदान केल्याचे सांगतानाच राष्ट्रवादीच्याच सदस्यांवर दगाबाजीचे खापर फोडत आहे. मात्र राष्ट्रवादीचे संचालक हा आरोप फेटाळत आहे. सुरेश देशमुख यांनी संचालकांवर टाकलेल्या अतिविश्वासामुळे हा धोका झाला. आ. कांबळे गटाच्या सदस्यांनीच खंडागळे यांना मतदान केले नाही, असा गंभीर आरोपही लावला जात आहे. या एकंदर घडामोडींमुळे देशमुख आणि कांबळे गट अप्रत्यक्षरित्या आमने-सामने आले आहे. या सर्व बाबी स्पष्ट व्हाव्यात. जनतेसमोर सत्य यावे, यासाठी श्याम कार्लेकर यांच्यावर अविश्वास ठराव आणावा, खरे-खोटे काय ते निकालात निघेल, असे सहकार गटातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुरेश देशमुख यांना साकडे घातले आहे. देशमुख यांनीही ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ म्हणून या दिशेने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)कार्लेकरांचे सभापतिपद अल्पावधित अविश्वासाच्या गर्तेतअविश्वासासाठी १२ सदस्यांची गरज आहे. देशमुख गट सहा व आ. कांबळे गटाचे पाच असे ११ सदस्य होतात. अडते व व्यापारी गटातून दोनपैकी १ सदस्य मिळाला, तर अविश्वास पारीत होऊ शकतो, या दृष्टीने देशमुख गटाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आ. कांबळे गट देशमुख गटाचा आरोप खोटा ठरविण्यासाठी अविश्वास प्रस्तावासाठी पुढाकार घेते वा यातून आपला काढता पाय घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.