शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे जलयुक्तमध्ये पाचच गावे

By admin | Updated: April 27, 2017 00:39 IST

कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने जलयुक्त शिवार अभियानात केवळ ५ गावांचा समावेश झाला.

एसडीओंचीही नाराजी : नियोजनाचा अभाव आष्टी (श.) : कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने जलयुक्त शिवार अभियानात केवळ ५ गावांचा समावेश झाला. यामुळे ३६ ग्रामपंचायतींना वंचित राहावे लागले. याचा निषेध नोंदवित सरपंचांनी कृषी विभागाला विकासाशी देणे-घेणे नसल्याचा आरोप केला आहे. नियोजनाच्या अभावामुळे निधी मिळाला नाही. मागील आठवड्यात झालेल्या आढावा सभेत एसडीओ शर्मा यांनीही नाराजी व्यक्त केली. जलयुक्त शिवार अभियानमधून शेताच्या काठावर नाला खोलीकरण बंधारा बांधकाम, गाळ काढणे, बांध-बंधिस्ती, तलाव यासह अनेक कामे करण्यासाठी निधीची तरतूद आहे; पण त्यासाठी गावोगावी ग्रामसभा घेऊन कामे समाविष्ट करावी लागतात. कृषी सहायक, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यात ग्रामसभा घेण्याचे धाडस दाखविले नाही. परिणामी, शासनाच्या योजनांपासून मुकावे लागले आहे. आष्टी तालुक्याला प्रधानमंत्री व मुख्यमंत्री पॅकेजमधून बऱ्याच योजना मिळाल्या होत्या. शेतकऱ्यांना सुविधा देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा त्या मागील उद्देश होता. त्यावेळी अधिकारी सक्रीय होते. आताही अधिकाऱ्यांवरच जलयुक्त शिवार योजना अलवंबून आहे; पण दुर्लक्षित धोरणाचा फटका बसत आहे. तालुक्याला नियमित तालुका, मंडळ कृषी अधिकारी नसून कृषी सहायकाची पदे रिक्त आहे. प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रमोद पेठकर यांनी कामाचा अधिक भार असल्याने योजना राबविण्यात मागे असल्याची प्रांजळ कबुली दिली आहे. जिल्हास्तरावरून अधिकारी सभा घेण्यासाठी वारंवार बोलवित असल्याने कामांकडे लक्ष नसल्याचेही सांगितले. विकास कामांचा आढावा घेतला तेव्हा तालुका कृषी अधिकारी गैरहजर होते. एसडीओ शर्मा यांनी केवळ पाच गावांना समाविष्ट केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी सक्रीय राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावर्षी तरी अर्ध्याधिक गावांना समाविष्ट करून न्याय द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)