शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘हायमास्ट’मुळे पालिकांसह ग्रामपंचायतींचे देयक ‘हायफाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 15:48 IST

ग्रामीण भागासह शहराच्या विकासाकरिता लोक प्रतिनिधींना स्थानिक विकास निधी दिल्या जातो. या विकास निधीतून वर्ध्यातील शहर व ग्रामीण भाग लखलखीत करण्यावर भर देत तब्बल ४ कोटी ४ लाख ९३ हजार रुपयाचे २७६ हायमास्ट लाईट लावले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व कंत्राटदाराचे प्रकाशपर्व चार वर्षात लावले चार कोंटीचे लाईट

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण भागासह शहराच्या विकासाकरिता लोक प्रतिनिधींना स्थानिक विकास निधी दिल्या जातो. या विकास निधीतून वर्ध्यातील लोकप्रतिनिधींनी चार वर्षात शहर व ग्रामीण भाग लखलखीत करण्यावर भर देत तब्बल ४ कोटी ४ लाख ९३ हजार रुपयाचे २७६ हायमास्ट लाईट लावले. यामुळे ग्रामपंचायत व नगरपालिकांचे देयक हायफाय झाले असले तरी; लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदारासाठी हा कालावधी ‘प्रकाशपर्व’ च ठरला आहे.आमदारांना दरवर्षी २ कोटींचा स्थानिक विकास निधी दिल्या जातो तर खासदारांना ५ कोटीचा निधी दिल्या जातो. या निधीतून ग्रामीण भागासह शहरातील अत्यावश्यक सुविधा पुरविण्यावर भर देणे क्रमाप्राप्त असतांना येथील लोकप्रतिनिधींनी हायमास्ट लाईट लावण्याचाच सपाटा चार वर्षात चालविला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ग्रामीण भागात तर नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात तब्बल २७६ हायमास्ट लाईट लावल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: २०१५-१६ ते २०१८-१९ पर्यंत लावण्यात आलेले बहूतांश हायमास्ट लाईट आता बंदावस्थेत आहे. त्याची दुरुस्तीही होणे शक्य नसल्याने लोकप्रतिनिंधी यावर केलेला ४ कोटी ४ लाख ९३ हजार रुपयांचा खर्च व्यर्थच गेल्याचे निदर्शनास येत आहे.ग्रामपंचायतींची बत्तीगुलग्रामीण भागातील पथदिव्यांचे देयक भरतानाच नाकीनव येत असताना ग्रामपंचातींच्या मागणीनुसार लोकप्रतिनिधींनी हायमास्ट लाईट गावागावात दिले आहे. चार लाईटच्या हायमास्टकरिता ४४० व्हॅट तर पाच लाईटच्या हायमास्टकरिता ५५० व्हॅट विद्यूत लागतात. सध्यात चार ते पाच लाईट असलेलेच हायमास्ट लावण्यात आले आहे. या एका हायमास्ट करीता एका दिवशी एक ते दीड युनिट विद्युत लागते. या एक ते दीड युनिट विद्युतमध्ये गावातील २५ ते ३० पथदिवे चालतात. यावरुन २५ ते ३० पथ दिव्यांची विद्युत एक हायमास्टकरिता लागत असल्याने ग्रामपंचायतचे देयक भरमसाठ वाढलेले आहे. त्यामुळे देयक भराये कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणचे हायमास्ट बंद असून दुरुस्ती करण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे.

एकाच कंत्राटदारावर मेहरबानीजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ग्रामीण भागात तर नगरपालिका व नगर पंचायतींच्या माध्यमातून खासदार आणि आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून हायमास्ट लाईल लावण्यात आले. याच्या कामाची रितसर निविदा प्रक्रियाही पार पडली. परंतू एकाच कंत्राटदाराने तीन ते चार नावाने निविदा भरुन काम घेतल्याचे बोलेले जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने कंत्राटदाराचेही चांगभल झाल्याचे दिसून येत आहे.

हायमास्टच्या किंमतीही डोळे दिपविणाऱ्याजिल्ह्यात एकू ण २७६ हायमास्ट लावण्यात आले आहे. या हासमास्टची किंमत ८० हजार रुपयांपासून तर ७ लाख २ हजार रुपयांपर्यंत आहे. पण, सध्या अर्धेअधिक हायमास्ट अखेरच्या घटका मोजत असल्याने यात कंत्राटदांसह इतरांचेही उखळ पांढरे झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Governmentसरकार