शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर-दहेगाव रस्ता उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 23:51 IST

बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम हाती घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर ते दहेगाव (गोसावी) या डांबरी रस्त्याची अवघ्या आठ महिन्यांत गिट्टी उखडून रस्त्यावर पसरली.

ठळक मुद्देदिलीप बिल्डकॉनच्या वाहनामुळे रस्ता खड्डयात : दुरस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम हाती घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर ते दहेगाव (गोसावी) या डांबरी रस्त्याची अवघ्या आठ महिन्यांत गिट्टी उखडून रस्त्यावर पसरली. त्यामुळे या मार्गावरून अवागमन करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.दोन वर्षापूर्वी सदर मार्गाचे डांबरीकरण होऊन रस्ता गुळगुळीत झाला होता. परंतु बुट्टीबोरी ते तुळजापूर रस्त्याचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीचे टिप्पर, ट्रक या मार्गावरून जात निर्माणाधिन सिमेंट मार्गाकरिता लागणारी गिट्टी तयार करण्याकरिता मोठे दगडे व मुरूमाची दहेगाव (गोसावी) येथून ने-आण करण्यात येते. दिवसाला या मार्गावरून जड वाहनांच्या याकरिता शेकडो फेºया होत असल्याने मार्गाची अक्षरश चाळणी होवून रस्ता उखडून त्यातील गिट्टी रस्त्यावर विखुरल्या गेली आहे. त्यामुळे दहेगाव व त्या पलीकडील चार ते पाच गावातील गावकºयांना केळझरकडे येतांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहनचालकांना या मार्गावरून वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी होणारे किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहे. केळझर ते दहेगाव (गोसावी) हे अंतर सहा कि.मी. असून बाजारपेठ आणि बॅँकेचे व्यवहार, विद्युत वितरण कंपनीशी निगडीत कामे केळझर येथूनच दहेगाव (गोसावी) सह पहेलानपूर, खापरी (ढोणे), आलगाव, जुनोना, आजनगाव आदी गावातील नागरिकांना करावी लागतात. त्यामुळे त्यांचे केळझरला येणे नित्याचेच होते. परंतु सदर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे दुचाकी, आॅटोरिक्षासह लहान वाहन चालकांना या रस्त्यावरून अवागमन करताना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. तरी बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत दोषींवर कारवाई करावी व या मार्गाची दुरुस्ती करावी.रस्त्याच्या कडा खचल्याने अपघाताची शक्यतारसुलाबाद- रसूलाबाद ते विरुळ (आ) या दोन्ही गावाला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कडा खचल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रसूलाबाद ते विरुळ दरम्यान जोडणाऱ्या मार्गावर येथील शेतकरी सुरेश ढोके यांच्या शेताजवळील मार्गाच्या मोठ्या प्रमाणात कडा खचल्याने अपघात होऊ शकतो. या ठिकाणी काही अंतरावर सीमेंट नळी (पायली ) टाकलेली आहे त्या ठिकाणी पुल आहे पण पाऊस आल्यामुळे त्या ठिकाणी काडी कचरा अडकून बुजतात आणि पाणी बाजूने फेकल्या जाते त्यामुळे त्याठिकाणी खोलगट भाग निर्माण झाला. या बाबतची माहिती लोकप्रतिनिधीला दिली ते पण दुर्लक्ष करीत आहे असा नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक