शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे करमणूक कर विभाग संपुष्टात

By admin | Updated: June 25, 2017 00:40 IST

गत अनेक वर्षांपासून कोट्यवधीचा करमणूक कर वसूल करणारा जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभाग बंद होणार आहे.

विक्रीकर विभागाकडून वसुली : कर्मचाऱ्यांचे होणार महसूल विभागात समायोजन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गत अनेक वर्षांपासून कोट्यवधीचा करमणूक कर वसूल करणारा जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभाग बंद होणार आहे. या कराचा अंतर्भाव वस्तू व सेवाकरामध्ये (जीएसटी) करण्यात आला आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीची जबाबदारी विक्रीकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे. जीएसटी लागू होण्यास १० दिवस शिल्लक असून जिल्हा प्रशासनाला करमणूक कर विभागाच्या अधिकाऱ्यांना महसूल विभागात इतरत्र विलीन करून घेण्याचे आदेश धडकले आहेत. यामुळे करमणूक कर विभाग संपुष्टात येणार आहे. करमणूक करापोटी प्रशासनाला वर्षाला २ कोटी ३० लाख रुपयांचा महसूल मिळतो. मागील वर्षी करमणूक कर विभागाने १ कोटी ८३ लाखांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळवून दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात करमणूक कर वसुलीसाठी स्वतंत्र विभाग आहे. जिल्ह्यातील चित्रपटगृहे, केबल आॅपरेटर्स, व्हीडीओ गेम पार्लर, अ‍ॅम्यूझमेंट पार्क, आनंद मेळावे तसेच वेळोवेळी तिकीट लावून होणारे मनोरंजनात्मक कार्यक्रम यावर करमणूक कराची आकारणी केली जाते. शिवाय त्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण करणे, कर बुडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे, करमणूक कराची वसुली करतानाच अनधिकृतपणे करमणूक कार्यक्रम कुणी घेत असतील तर त्यांचा शोध घेणे, त्यांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करणे आदी कामे या विभागामार्फत केली जातात; पण जीएसटी या नवीन कर प्रणालीत अन्य करांसोबतच करमणूक कराचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य जीएसटी वसुलीचा अधिकार विक्रीकर विभागाला देण्यात आला आहे. परिणामी, जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाकडे कुठलेही काम राहिले नाही. यामुळे हा विभाग बंद होणार असून कर्मचाऱ्यांना महसूल विभागात हलविण्यात येणार आहे. १० दिवसांत होणार अंमलबजावणी १ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात नवीन करप्रणालीची अंमलबजावणी सुरू होण्यास दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे शासनाकडूनही जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाबाबत आदेश धडकले आहेत. करमणूक कर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल विभागात अन्यत्र विलीन करण्यात येणार आहे. तत्सम आदेश आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिली.