शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मीच्या आगमनावर जीएसटीमुळे महागाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:21 IST

गणरायाच्या पाठोपाठ आता घरोघरी महालक्ष्मी म्हणजेच गौरीची स्थापना होणार आहे. गौरीच्या आगमनाची जय्यत तयारी केली जाते.

ठळक मुद्देसोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली : बाजारपेठेत खरेदीकरिता लगबग

श्रेया केने ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गणरायाच्या पाठोपाठ आता घरोघरी महालक्ष्मी म्हणजेच गौरीची स्थापना होणार आहे. गौरीच्या आगमनाची जय्यत तयारी केली जाते. गौरींचा थाटमाट मोठा असल्याने आकर्षक आरास, पंचपक्वान, भरजरी वस्त्रे आणि दागिणे असा साज असतो. स्थानिक बाजारपेठेत खरेदीकरिता लगबग दिसून आली. यंदा जीएसटीमुळे प्रत्येक वस्तूंचे दर वाढलेले दिसून आले.यात महालक्ष्मीचे मुखवटे साधारण २०० ते ३०० रूपयांनी महाग झाले असून दागिण्यांची भाववाढ झाली आहे. असे असले तरी बाजारात विक्रीकरिता असलेल्या आकर्षक दागिण्यांच्या मागणीत वाढ आहे. मोत्यांचा सूबक दागिण्यांना विशेष पसंती आहे. यासह पूजा साहित्याचे दर वाढलेले आहे.महालक्ष्मी पुजनाकरिता धातूचे तसेच काच आणि स्टोनवर्कचे तबक, तोरण, माळ, प्लास्टिक फुलांचे हार, सजावट आणि मंडपाकरिता लागणारे साहित्य यंदा ५० ते १०० रुपयांनी वाढले आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटीमुळे झालेल्या भाववाढीचा परिणाम विक्रीवर जाणवत असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी यावेळी लोकमत सोबत बोलताना सांगितले.पितळी धातुपासून निर्मित साहित्याची गर्दीपितळी धातूपासून निर्मित पुजासाहित्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. पितळीच्या वस्तूंना पुजेत विशेष मान आहे. त्यामुळे कदाचित वस्तूंची विक्री वाढल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. बाजारातही महालक्ष्मी पुजनानिमित्त विशिष्ट आकारातील नंदादीप, पुजेची थाळी, समई, तबक, आदी वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्या आहेत.मातीचे मुखवटे अकोला आणि अमरावती येथून विक्रीसाठी येतात. यंदा मातीचे मुखवटे एक हजार ते १५०० पर्यंत आहे. यातही २०० ते ३०० रूपयांची सरसकट वाढ झाली आहे. मुखवटे तयार करताना लागणाºया वस्तंूवर जीएसटी लागल्यामुळे ही दरवाढ झाली आहे.महालक्ष्मीचे मातीशिवाय धातुपासून निर्मित मुखवटे सुद्धा मिळतात. हे मुखवटे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून आणले जातात. या मुखवट्यांना वाढती मागणी असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी धातूपासून निर्मित मुखवटे असायचे. मात्र असे मुखवटे मिळेनासे झाल्याने मातीचेच मुखवटे दिसून येते. कालबाह्य होत असलेले पितळी मुखवटे पुन्हा नव्या स्वरूपात बाजारात विक्रीसाठी आले आहे. या मुखवट्यांची किंमत ३,५०० ते ४ हजार पर्यंत आहे.