शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्यांच्या पसाऱ्यामुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 22:09 IST

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विठोबा चौकादरम्यान असलेला श्रीराम टॉकीज चौक रस्ता श्रीराम टॉकीजकडून डांगरी वॉर्ड, सेंट्रल वॉर्डकडे जाणाºया रस्त्यावर दोनही बाजूने भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या लावण्यात येत असल्याने हा रस्ता पादचारी, वाहनधारक यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे.

ठळक मुद्देपालिकेचे दुर्लक्ष : १६ फुटांचा रस्ता झाला ८फूट

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विठोबा चौकादरम्यान असलेला श्रीराम टॉकीज चौक रस्ता श्रीराम टॉकीजकडून डांगरी वॉर्ड, सेंट्रल वॉर्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोनही बाजूने भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या लावण्यात येत असल्याने हा रस्ता पादचारी, वाहनधारक यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा अशी नागरिकांची मागणी आहे.या मार्गावर दररोज दुपारी तसेच सोमवारी व्यावसायिकांचीच गर्दी दिसून येते. नगर पालिकेच्या १६ फुट बनविलेल्या डांबरी रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने थाटलेली दुकाने आणि याच रस्त्यावर अगदी मधोमध भाजी विक्रेत्यांच्या बंड्यांच्या रांगा यामुळे रस्त्यात रहदारी करण्यासाठी बंड्यांच्या एका बाजूला पाच ते सहा फुटाची उरलेली जागा तर दुसºया बाजूला चार ते पाच फुटाची जागा शिल्लक राहते. यात भाजी खरेदी करणाºयांची दुचाकीवरून असलेली खरेदी आणि उरलेल्या जागेतून जुन्या वस्तीतून येजा करण्यासाठी २० हजार लोकसंख्या असलेल्या जुनी वस्तीच्या नागरिकांसाठी एकमेव संपर्क रस्ता आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत जायला किंवा बाजारपेठेतून घरी यायला हाच मार्ग आहे.गेल्या तीन वर्षांपासून या मार्गावर किरकोळ भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुकाने लावून रस्ताच ८ फुटाचा ठेवला आहे. हाच मार्ग पुढे श्रीराम टॉकीज चौकात जातो तेव्हा तर तेथे तर दोन्ही बाजूनी भाजी बाजाराची दुकाने असतात. त्याशिवाय रस्त्याच्या मधोमध भाजीच्या बंड्या लावून भाजीची विक्री रस्त्यावरच केल्या जाते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी उरलेल्या अत्यंत अरूंद गल्लीतूनच रहदारी पुढे सरकते. या उलट भाजी बाजाराकरिता नव्याने बांधलेले ओटे गेल्या ३ ते चार महिन्यांपासून आवंटीत न केल्यामुळे तसेच पडून आहेत.रहदारीसाठी अडचणनगर परिषद हिंगणघाटने आठवडी बाजारात सिमेंट रस्त्याची व्यवस्था, मुख्य रस्त्याचे रूंदीकरण, आणि भाजी विक्रेत्यांसाठी सिमेंटचे ८ ओटे बांधले परंतु समस्या मात्र जैथे थेच आहेत. तीन ते चार महिन्यांपासून हे ओटे बांधून झाले असले तरी त्याच्या आवंटनाची प्रक्रिया अद्याप प्रतिक्षेतच आहे. त्यामुळे आठवडी बाजारा लगतच्या मु्ख्य रस्त्यावरील रहदारीचा प्रश्न मात्र सुटला नाही. याउलट सर्वात अधिक गर्दी तेथेच होते. दिवसभर वाहतुकीसाठी खोळंबा होतो. तिथूनच जाणारी दुचाकी, कार यांना तर वाहतुकीच्या अडचणींना नेहमीच त्रास होतोशहरातील डॉ. बाबासाहेब आंबेकर चौक ते विठोबा चौकादरम्यान असलेल्या श्रीराम आॅकीज चौककडून सेंट्रल डांगरी वॉर्डाकडे जाणाºया रस्त्याची रहदारीला जुन्या वस्तीच्या रहिवाशांनी हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी केली आहे.शोभेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेजुनी श्रीराम टॉकीज चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु त्याचा काहीच उपयोग आतापर्यंत झाला नाही. चौकात व पुढे रस्ता मोकळा ठेवण्याची वाहतुक पोलिसांची जबाबदारी हिंगणघाटच्या पोलीस प्रशासनाची असून ते या कार्यात निष्क्रीय ठरले आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी