शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचे हाल

By admin | Updated: November 29, 2015 02:54 IST

तालुक्यातील आदिवासी भागाचा आणि गावांचा विकास व्हावा म्हणून कोट्यवधी रुपये रस्ते व अन्य योजनांसाठी दिले जातात;

निकृष्ट कामे : कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीतळेगाव (श्या.पं.) : तालुक्यातील आदिवासी भागाचा आणि गावांचा विकास व्हावा म्हणून कोट्यवधी रुपये रस्ते व अन्य योजनांसाठी दिले जातात; पण संबंधित कंत्राटदार निकृष्ट कामे करीत असल्याने तो निधी व्यर्थ खर्च होत असल्याचे दिसते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामीण नागरिकांचे हाल होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहे.आदिवासी बहुल व ग्रामीण भागातील कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जातात. यामुळेच परिसरातील बहुतांश रस्ते उखडले आहेत. रस्त्यांना जागोजागी खड्डे पडले असून घरकुलाच्या इमारतींनाही भेगा गेल्या आहेत. काही घरकूल कोसळण्याच्या मार्गावर आहे. यामुळे संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी माणगी होत आहे. आष्टी तालुक्यात अनेक गावे आहेत. या परिसरात आदिवासी, बंजारा बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पोरगव्हाण, पंचाळा, बार्म्बडा, किन्ही मोई, पांढुर्णा, शिरकुटणी या गावांतील नागरिकांना दळणवळणाची सुविधा व्हावी तसेच गावे शहराशी जोडली जावी म्हणून रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ठक्करबाप्पा योजना तसेच नाबार्डसह विविध योजनांतून निधी आणला गेला; पण रत्यांच्या बांधकामात कंत्राटदारांनी गैरप्रकार केल्याने अनेक रस्ते उखडले आहेत. एकाच वर्षाच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. यात कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ गेला. रस्ते बांधकामात अंदाज पत्रकाप्रमाणे साहित्य वापरले जात नाही. गिट्टी, डांबर दिसतच नसल्याची ओरड ग्रामस्थांतून होत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराकडे शाळेत येताना सुविधा मिळावी, हा यामागचा उद्देश होता; पण मुख्य विषयालाच तिलांजली मिळाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांमध्येही बिघाड येत असल्याचे दिसते. याच खडतर रस्त्याने आदिवासी ग्रामस्थांना पायी यावे लागते. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर पायी जाण्याची वेळ येत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून कोट्यवधी रुपये केवळ रस्त्यांवर खर्चिले गेले; पण गावांचा विकास झालाच नसल्याचे चित्र आहे. रस्त्यांची मात्र दुरवस्था झाली आहे. संबंधित कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून निकृष्ट कामे केली. प्राकलनाप्रमाणे कामे होत नसल्याने अल्पावधीत दुरूस्तीची वेळ येते. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कामांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)