शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

उत्पादनात घट तरी कापसाची आवक वाढली

By admin | Updated: February 15, 2015 01:44 IST

खरीप हंगाम धोक्याचा ठरला. शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्न जागीच गेले. यात शासनाच्यावतीने सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर केला.

विजय माहुरे सेलूखरीप हंगाम धोक्याचा ठरला. शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्न जागीच गेले. यात शासनाच्यावतीने सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर केला. यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. असे असताना सेलूच्या बाजारेपेठेत मात्र कापसाच्या आवकीने तीन वर्षाचे आकडे मोडीत काढले. त्यामुळे येथे येणारा कापूस कुठला, अशी चर्चा जोर धरत आहे.तालुक्यात कापसाचे क्षेत्रफळ व ओलिताचा कापूस पिकविणाऱ्यांची संख्या अधिक असताना यावर्षी प्रथमच फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात कापसाची उलंगवाडी झाली. असे असताना मे महिन्यापर्यंत कापूस बाजारपेठे येतो. पण सेलूच्या बाजारपेठेत आर्थिक वर्षाचा विचार करता अजूनही ४५ दिवस शिल्लक आहेत. असे असताना गत वर्षीच्या तुलनेत ६० हजार क्विंटलने कापसाची आवक वाढली आहे.सेलू तालुक्यातील बहुतांश कापूस आंजी, खरांगणा व आर्वीच्या बाजारपेठेत विक्रीस जातो. असे असतानाही सेलूच्या बाजारपेठेत कापूस खरेदी वाढली आहे. ही खरेदी कशामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे. २ फेब्रुवारीपर्यंत सेलूच्या उपबाजारपेठेत हिंगणी व जुवाडी येथील कापूस संकलन केंद्रावर ९० हजार क्विंटलच्यावर कापूस खरेदी झाली. नगदी चुकारा हे कारण येथे असल्याचे शेतकरी सांगतात तर सेलू येथील दोन खरेदी केंद्रावर १ लाख क्विंटल कापूस खरेदी झाली. पणन महासंघाला फक्त ५ हजार क्विंटलवर समाधान मानावे लागले.एकीएकडे दरवर्षीच्यास तुलनेत कापूस पिकावर आलेल्या संकटामुळे अर्धेच उत्पन्न हातात असल्याचे चित्र आहे. असे असतानाही तीन वर्षाच्या तुलनेत कापसाची आवक वाढली, हे मात्र न उलनगडणारे कोडे ठरत आहे. कापसाची वाढलेली आवक मात्र दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना विचार करायला लावणारी बाब ठरत आहे. अजूनही शेतात बराच कापूस पडून आहे. यामुळे यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.