शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्युने मृत्यू होऊनही नाल्यांची साफसफाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:07 IST

रमणा गावातील सोळा वर्षीय तृप्ती गजानन नाईक हिचा एक महिन्यापूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. गावातील स्वच्छतेकडे लक्ष न देता नाल्या गाळाने तुडुंब भरूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.

ठळक मुद्देरमणा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : गावातील नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : रमणा गावातील सोळा वर्षीय तृप्ती गजानन नाईक हिचा एक महिन्यापूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. गावातील स्वच्छतेकडे लक्ष न देता नाल्या गाळाने तुडुंब भरूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. आरोग्य विभाग डेंग्यूने अजून किती बळी घेण्याची वाट पाहात आहेत, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.रमणा येथील वॉर्ड क्र. ३ चे प्रकाश आत्माराम नाईक यांनी वॉर्डातील रहिवासींच्या स्वाक्षरीचे निवेदन ग्रामपंचायतीला दिले. मात्र त्याला केराची टोपली दाखविली. वारंवार तगादा लावल्यावर सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक मोक्यावर येवून गेले मात्र जाणुनबूजन तेथील रहिवासीवर राग काढल्या जात आहे. दोन वर्षापासून सांडपाणी नालीत तुडुंब गाळाने भरून गेले. लागूनच नाला आहे हे पाणी नाल्यामध्ये सोडल्यास पुढे वाहत जावू शकते. मात्र ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मर्जीतील लोकांच्या हट्टापुढे नतमस्तक झाले आहे.आरोग्य विभागाचे अधिकारी पाहणी करून गेले. त्वरीत नालीतील तुंबलेला गाळ काढल्या जावून दुर्गंधीयुक्त पाण्याला मार्ग काढून देण्याचे आश्वासन दिले. ग्रामसेवक कर्तव्यात हयगय करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नाल्या गाळांनी भरल्यामुळे सांडपाणी नालीवरून वाहताना पाहूनही ग्रा.पं. चे पदाधिकारी व ग्रामसेवक त्वरीत साफसफाई करीत नसतील तर डेंग्यूने कुणाचा बळी गेल्यास ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या अस्वच्छतेमुळे गावकरी संतप्त असून रोष व्यक्त करीत आहे.नालीचे बांधकाम अपूर्णवॉर्ड क्र. ३ चे नाली बांधकाम अर्धवट आहे. ते बांधकाम पूर्ण करून तेथील रहिवाशांना न्याय देण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षांपासून साचून असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या वासामुळे घरात बसून जेवण करणे कठीण होत असल्याचे तेथील नागरीक सांगतात.चार-पाच वर्षांपासून बुजलेला शोषखड्डा उपसण्यात आला नाही. त्यामुळे या नालीचे पाणी जाण्यास मार्ग नव्हता. बाजुला शेतकऱ्याची मोठी नाली (बांधी) आहे. तो त्यात पाणी सोडू देत नाही. उद्याच शोषखड्डा साफ करून ते सांडपाणी त्यात सोडून ही समस्या सोडविण्याचे काम करून देतो.- व्ही.बी. कानतोडे, ग्रामसेवक, रमणा.

टॅग्स :dengueडेंग्यू