शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या सातत्यामुळे शेतकऱ्यांना ५० टक्के दिलासा

By admin | Updated: September 1, 2014 23:49 IST

उशिरा का होईना तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ यामुळे आॅक्सीजनवर असलेली पिके आता डालेत आहेत़ या पावसामुळे तालुक्यातील ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीसाठी

कारंजा (घा़) : उशिरा का होईना तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ यामुळे आॅक्सीजनवर असलेली पिके आता डालेत आहेत़ या पावसामुळे तालुक्यातील ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीसाठी लावलेला खर्च भरून निघण्याची आशा पल्लवीत झाली आहे़तालुक्यात ६० हजार हेक्टर एकूण जमीन असून पेरणीयोग्य जमीन ४५ हजार हेक्टर आहे़ पैकी ४२ हजार ४४५ हेक्टरमध्ये प्रत्यक्ष पेरणी झाली़ २१ हजार ११९ हेक्टरमध्ये सोयाबीन, १४ हजार ३२३ हेक्टरमध्ये कापूस, ५०८६ हेक्टरमध्ये तूर, १२५६ हेक्टरमध्ये ज्वारी, ३५५ हेक्टरमध्ये भूईमुंग तर २५० हेक्टर मध्ये उडीद, तीळ, ऊस लावण्यात आला आहे़ यावर्षी सोयाबीनच्या तुलनेत कपाशीचा पेरा वाढला आहे़ पाऊस उशीरा आला़ नंतर सुमारे २५ दिवसांची बुट्टी मारली़ यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली़ शेतकऱ्यांजवळील होती नव्हती रक्कम बी-बियाणे, खते खरेदी करण्यात खर्च झाली़ बँकांनी वेळेवर पीक कर्ज दिले नाही़ खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागले़ काही शेतकऱ्यांना दागदागीने विकून व शेती गहाण ठेवून पेरणी करावी लागली़ पावसाच्या लहरीपणामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले़ गतवर्षीप्रमाणे यावर्षीही नापिकी व आर्थिक नुकसान होणार या विवंचनेत शेतकरी होता; पण गणपतीच्या आगमनापूर्वी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली़ आतापर्यंत तालुक्यात ४६० मिमी पावसाची नोंद आहे़ प्रारंभी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या पावसामुळे भरून निघणार नाही़ त्या पिकांची पावसाअभावी वाढच झालेली नव्हती; पण उशिरा पेरलेल्या सोयाबीन व कापूस पिकासाठी हा पाऊस वरदान ठरलेला आहे़ एकंदरीत ५० टक्के शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा दिला़ बऱ्याच शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला़ निदान लावलेला खर्च निघेल, अशी आशा पल्लवीत झाली आहे़ सहकारी बँकेचे व्यवहार बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना जमा रक्कम काढता आली नाही़ निवडणूक तोंडावर असल्याने बँकेचे व्यवहार सुरळीत होतील, अशी अपेक्षा होती; पण अद्याप कारवाई झाल्याचे दिसते नाही़ आचार संहिता सुरू होण्यापूर्वी तरी सहकारी बँकांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी शेतकरी तसेच खातेदारांच्यावतीने करण्यात येत आहे़(तालुका प्रतिनिधी)