शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याच्या निकृष्ठ बांधकामामुळे पाणी गेले वाहून

By admin | Updated: July 13, 2017 00:55 IST

नजीकच्या खानगाव येथे जलयुक्त शिवार योजनेत शेतालगत असलेल्या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. यात नाला खोलीकरण करण्यात आले होते.

शेतातील माती गेली खरडून : जलयुक्त शिवार योजनेत केले होते काम लोकमत न्यूज नेटवर्क मोझरी (शेकापूर) : नजीकच्या खानगाव येथे जलयुक्त शिवार योजनेत शेतालगत असलेल्या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. यात नाला खोलीकरण करण्यात आले होते. मे महिन्यात बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. मात्र पहिल्याच पावसाळ्यात बंधाऱ्याचा काही भाग वाहुन गेला. यात मोझरी (शे.) येथील विजय येंडे यांच्या शेतातील माती खर्डून गेल्याने त्यांचे नुकसान झाले. सदर बंधारा बांधकामाची चौकशी करण्याची मागणी आहे. तसेच हा बंधारा फुटल्याने बंधाऱ्यात पाणी थांबत नाही. त्यामुळे या बंधाऱ्याचा पाणी साठविण्याचा उद्देशच अयशस्वी झाला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्न शिवारातील शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देत त्वरित बंधाऱ्याची दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे. सदर बंधाऱ्याची वेळीच डागडुजी केल्यास जलयुक्त शिवार योजनेचा उद्देश पूर्ण होईल, अशा प्रतिक्रीया शेतकरी वर्गातूंब उमटत आहे. शासनाच्यावतीने अनेक उपयुक्त योजना राबविण्यात येतात. योजनांचा उद्देश सर्वांना लाभ मिळावा असा असला तरी त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याचे यावरुन दिसून येते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत परिसरात नाला खोलीकरण करुन त्यावर बंधारे बांधण्यात आले आहे. या माध्यमातून साठविलेल्या पाण्याद्वारे जलस्तर वाढविण्याचा उद्देश चांगला असला तरी बंधारा बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्यतेचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. कंत्राटदाराद्वारे करण्यात आलेल्या कामाची वेळीच पाहणी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रकार घडत आहेत.