शेतकरी हवालदिल : भरपाईची मागणी पिंपळखुटा : गत काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे शेताला लागून असलेला पाणलोट बंधारा फुटला. यामुळे शेतात पाणी शिरून पीक खरडून निघाले. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पिंपळखुटा येथील गजानन एकापुरे यांचे गुंडमुंड येथे तीन एकर शेत आहे. शेताला लागून यावर्षी पानलोट योजनेंतर्गत बंधारा बांधण्यात आला. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे बंधारा फुटला आणि एकापुरे यांचे पीक मातीसहित वाहून गेले. शेतात बंधाऱ्यातील रेती व गोटे गोळा झाले आहे. बंधाऱ्याचे बांधकाम निष्कृष्ट झाल्याने तो वाहून गेल्याचा आरोप सदर शेतकऱ्याने कृषी विभागाला दिलेल्या तक्रारीत केला आहे. सदर शेतकरी हा अत्यल्प भुधारक आहे. शेतीशिवाय दुसरे कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन त्याच्याकडे नाही. बँकेचे कर्ज कसे फेडावे व आता कोणते पीक घ्यावे असा प्रश्न एकापुरे यांना पडला आहे. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सदर शेतकऱ्यांने कृषी व महसूल विभागाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)
बंधारा फुटल्याने शेतातील पीक गेले वाहून
By admin | Updated: July 31, 2016 00:52 IST