शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

सीएम वॉररूममुळे निम्न वर्धाच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 22:34 IST

वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, वर्धा, हिंगणघाट आदी तालुक्यासाठी वरदान ठरू पाहत असलेला निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री यांच्या वॉररूममध्ये या प्रकल्पाचा समावेश असून जून २०१९ पर्यंत............

ठळक मुद्देपंतप्रधान कृषी सिंचन योजना : जिल्ह्यातील चार तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, वर्धा, हिंगणघाट आदी तालुक्यासाठी वरदान ठरू पाहत असलेला निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री यांच्या वॉररूममध्ये या प्रकल्पाचा समावेश असून जून २०१९ पर्यंत सिंचन निर्मितीची कामे व जून २०२० पर्यंत पाटसºयांचीे कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत, अशी माहिती प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता ग. म. घुगल यांनी लोकमतशी बोलताना दिली.जल है तो कल है, पाणी वाचवा पाण्याचा काटकसरीने उपयोग करा, यासारखे कार्यक्रम मागील तीन वर्षांत राबवून या भागातील शेतकºयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा संदेश दिला जात आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूसंपादनात अडचणी निर्माण होत असल्याने सिंचन निर्मितीच्या उर्वरित निविदा काढता येत नाही. त्यामुळे कामाला गती देण्यासाठी अडचणीच्या ठिकाणी कायद्याने जमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या भागातील मोझरी, शेकापूर, अलमडोह, टाकळी चणा, गंगापूर, टाकळी दरणे, आंजी मोठी आदी गावांतील प्रकल्पाच्या अंत्यभागात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन मागणीनुसार पाण्याचे नियोजन करण्यात आले.त्यामुळे गौळ, कोळोणा, अडेगाव, गंगापूर, पिंपळगाव, दापोरी, गिरोली, अंबोडा, खानगाव, वरूड, पोटी, मोझरी, शेकापूर, कापसी, कोसुर्ला, टाकळी दरणे, अलमडोह आदी गावांतील लोकांना आवश्यकतेनुसार पाणी देणे शक्य झाले. रब्बीचे सिंचन सुरू असताना काही लोकांनी खानगाव वितरिका व नांदगाव वितरिकेचे दरवाजे खराब केल्यामुळे आलेल्या तांत्रिक अडचणी दूर सारून कास्तकारांना पाणी देण्यात आले, अशी माहिती घुगल यांनी दिली.शेतकºयांना पाणी वेळेवर मिळण्याचे दृष्टीने प्रकल्पाअंतर्गत वितरिका व लघुकालव्याच्या दरवाज्यांची कास्तकारांनी उघडझाप करू नये, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या असून सिंचनाच्या या कार्यात सर्वांनी मदत करावी. पाण्यावर सर्वांचा हक्क लक्षात घेता नियोजनाच्या माध्यमातून काटकसरीचे उदाहरण घालून द्यावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता घुगल यांनी केले. यंदा पुर्वीच समाधानकारक पाऊस न झाल्याने जलशय तळ दाखवत आहेत.मागील तीन वर्षांत २० हजार हे.आर. शेतजमीन सिंचनाखालीप्रकल्पाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत २० हजार हे.आर. शेतजमीन सिंचनाखाली आली. याचा प्रत्यक्ष लाभ कास्तकारांना मिळला. धरणात केवळ २८ टक्के जलसाठा उपलब्ध असतानासुध्दा कास्तकारांच्या मागणीनुसार खरीप व रब्बी हंगामात प्रत्येकी एक पाळी याप्रमाणे पाणी देण्याचे नियोजन करण्यास अभियंत्यांचे परिश्रम मोलाचे ठरले आहे.प्रकल्पाची सिंचन क्षमता ६३ हजार ३३३ हे. आर असून यामध्ये आर्वी उपसा सिंचन व खर्डा बॅरेज मिळून सिंचन होणार आहे. यावर्षीच्या जून पर्यंत ३४ हजार ८७० हे. आर. क्षेत्रात सिंचन झाले आहे. उर्वरित २८ हजार ४६३ हेक्टर आर. ची कामे प्रगतिपथावर आहेत.आर्वी तालुक्यातील धनोडी येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जात आहे. या प्रकल्पावर ४५ कि.मी. चा डावा कालवा, ३८ कि.मी. चा देवळी शाखा कालवा व २६ कि.मी. च्या गिरोली शाखा कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन या प्रकल्पांतर्गत पुलगाव येथे पुलगाव बॅरेज तसेच सिंचनासाठी वंचित राहणाºया गावासाठी खर्डा बॅरेज व आर्वी उपसा सिंचनाचा समावेश आहे.- ग. म. घुगल, उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती