शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे चण्यावर घाटेअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:05 IST

यावर्षी हंगामाच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला. यातच शेतमालाला मिळणारा अल्प दर आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देदक्षता गरजेची : कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी हंगामाच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला. यातच शेतमालाला मिळणारा अल्प दर आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ढगाळ वातावरण चार-पाच दिवस कायम राहिल्यास चणा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.खरीप हंगामात प्रारंभी अल्प पावसामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीची वेळ आली होती. वेळोवेळी सोयाबीन पिकाची निगा राखल्याने पीकही अल्पवधीत बहरले; पण पाहिजे त्या प्रमाणात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनचे उतारे आले नसल्याचे शेतकरी सांगतात. यातच यंदा सोयाबीनला मिळालेला दर हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत अल्प असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. सोयाबीनने धोका दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात गव्हासह चणा पिकाची लागवड केली; पण सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे चणा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरण पुढील चार ते पाच दिवस कायम राहिल्यास चणा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शिवाय शेतकऱ्यांनीही सल्ला घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.कापूस शेतातचसध्याच्या ढगाळ वातावरणाचा कपाशी पिकावर कुठलाही परिणाम होणार नाही, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगितले जात असले तरी जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतातील कापूस मजुरांअभावी शेतातच असल्याचे दिसून येते. ढगाळ वातावरणादरम्यान गारपीट वा थोडाही पाऊस झाल्यास आधीच बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झालेल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गव्हावर परिणाम नाहीढगाळ वातावरणाचा गहू पिकावर विपरित परिणाम होणार नाही, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे; पण पुढील काही दिवस असेच ढगाळ वातावरण राहिल्यास थोड्याफार प्रमाणात गहू पिकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना सुरूजिल्ह्यातील बहुतांश तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर पिकाची सवंगणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी तुरीची मळणी केली असली तरी अनेकांच्या शेतात तूर पिकाच्या गंजी असल्याचे दिसून येते. ढगाळ वातावरण असल्याने अचानक पाऊस आल्यास तुरीची गंजी भिजून नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे दिसून आले.कमी दाबाचा पट्टासध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा वरच्या भागातून खालच्या भागापर्यंत तयार झाल्याने पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आली आहे.अचानक वातावरणात बदल झाला आहे. सध्याचे ढगाळ वातावरण आणखी चार ते पाच दिवस कायम राहिल्यास चणा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच उपाययोजना कराव्यात. घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ इसी १० मिली १० लिटर पाण्यात मिळवून फवारावे. अन्य उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क करावा.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.