शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पक्षविरोधी कारवायांमुळे बसपातून दोघांची हकालपट्टी

By admin | Updated: March 17, 2017 01:59 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षशिस्तीचा भंग करून पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल

जिल्हा सचिवासह एका स्वीकृत सदस्याचा समावेश वर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षशिस्तीचा भंग करून पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल बहुजन समाज पक्षाचे वर्धा जिल्हा सचिव हर्षवर्धन गोडघाटे व पुलगाव पालिकेतील पक्षाचे स्वीकृत नगरसेवक कुंदन जांभूळकर यांचे बसपातून निलंबन केल्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. बसपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या निवडणुकांची समीक्षा झाली. वर्धेत दोन जि.प. व दोन पंचायत समिती निवडून आणले; याचवेळी, पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात जात व पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यासंदर्भात चर्चा प्रदेश कार्यकारिणीत झाली. त्यानुसार १५ मार्च २०१७ रोजी झालेल्या जिल्हा व विधानसभा पदाधिकारी तसेच उमेदवारांच्या बैठकीत मंडळ को-ओर्डीनेट अ‍ॅड. सुनील डोंगरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमलता शंभरकर व जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सचिव हर्षवर्धन गोडघाटे व कुंदन जांभूळकर यांचे पक्ष सदस्यत्व समाप्त करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला. यापुढे जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ता पक्षविरोधी कारवायांमध्ये लिप्त आढळतील अशांचेही त्वरित निलंबन करणार असल्याचे पक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)