शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

१४ वर्षांपासून नोकरी न मिळाल्याने ‘त्या’ कुटुंबाची उपासमार

By admin | Updated: November 15, 2014 22:52 IST

जून २००० मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगाराच्या रिक्त जागेवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यास नोकरी देण्याची मागणी करण्यात आली होती़ यास १४ वर्षांचा कालावधी लोटला असताना

पुलगाव : जून २००० मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगाराच्या रिक्त जागेवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यास नोकरी देण्याची मागणी करण्यात आली होती़ यास १४ वर्षांचा कालावधी लोटला असताना कारवाई केली नाही़ यामुळे त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश सफाई मजदूर काँगे्रसने निवेदनातून केली आहे़हरिजन मेहतर समाजाचे रामू बोदू सारसर हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कायमस्वरूपी सफाई कामगार पदावर कार्यरत होते़ सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या जागेवर त्यांच्या परिवारातील सदस्याला नोकरी मिळावी म्हणून सारसर परिवाराने सतत पाठपुरावा केला; पण संबंधित प्रशासनाने त्यांच्या विनंती अर्जाचा विचार केला नाही़ यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप प्रदेश सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेश महामंत्री पी़बी़ भातकुले यांनी केला आहे़ राम सारसर यांच्या निवृत्तीनंतर शासनाच्या लाडपागे कमिटीच्या परिपत्राकानुसार रामूची सून माया सारसर हिला सफाई कामगार पदावर घ्यावे, यासाठी त्यांनी संस्थेकडे रितसर अर्ज सादर केला; पण ती इयत्ता चवथी उत्तीर्ण नसल्याचे कारण सांगून तिला नोकरी देण्याचे संबंधित प्रशासनाने अमान्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले़ यानंतर रामू सारसर यांनी त्यांचा नातू आकाश पुनमचंद सारसर याला सफाई कामगार पदी सामावून घेण्याबाबत अर्ज केला; पण आकाश इयत्ता दहावी उत्तीर्ण असताना त्याला नोकरी दिली नाही, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला़ वास्तविक, अशा प्रकरणांत ३० दिवसांच्या आत नियुक्तीचे प्रावधान व शासन धोरण आहे; पण संस्था टाळाटाळ करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली़(तालुका प्रतिनिधी)