शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

रेडिओ फ्रिक्वेन्सी अ‍ॅबिलेशनद्वारे दुहेरी सर्किट रुग्णावर हृदयोपचार

By admin | Updated: July 2, 2016 02:22 IST

दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात आणखी एक नवी उपचारपद्धती अंमलात आली आहे.

जीवनदायी अंतर्गत मोफत उपचार : अतिरिक्त सर्किट नष्ट करण्यात डॉक्टरांना यशवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात आणखी एक नवी उपचारपद्धती अंमलात आली आहे. या पद्धतीमुळे हृदय रुग्णाला दिलासा देण्यात यश प्राप्त झाले आहे. हृदयरोग विभागातील तज्ज्ञांनी इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी करून रेडिओ फ्रिक्वेन्सी अ‍ॅबलेशन प्रक्रियेद्वारे हृदयाला दुहेरी सर्कीट असणाऱ्या रुग्णावर उपचार केले.चंद्रपूर जिल्ह्यातील, मुल तालुक्यातील शिनतळा येथील लता मारोती चलाख (३४) या महिलेला बऱ्याच दिवसांपासून जलदगतीने हृदयात धडधड होण्याचा व छातीत दाटून येण्याचा त्रास होता. हा त्रास वाढत गेल्याने तिला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. पर्याप्त उपचार उपलब्ध नसल्याने अखेर सावंगी (मेघे) रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील हृदयरोग विभागातील डॉ. गजेंद्र मनक्षे यांनी वैद्यकीय तपासणी केली असता रुग्णाच्या हृदयाला दुहेरी सर्कीट असल्याचे ईसीजी व अन्य चाचण्यात दिसून आले. हृदयाला अतिरिक्त सर्कीट असणाऱ्या रुग्णाचा ईसीजी सामान्य रुग्णासारखा नसतो. सामान्यत: हृदयस्पंदनांची गती मिनिटाला १०० असते. मात्र दुहेरी सर्कीट असणाऱ्या रुग्णांच्या हृदयाची स्पंदनगती १८० ते १९० पर्यंत जाते. त्यामुळे, हृदयाची अत्याधिक धडधड होण्यापासून तर रुग्ण मूर्च्छित होण्यापर्यंत अनेक धोके संभवतात. डॉ. गजेंद्र मनक्षे, डॉ. अभिजित शेळके, डॉ. सतीश खडसे यांनी रुग्णाच्या आजाराचे पूर्ण निदान करून रुग्णालयातील कॅथ लॅब आणि हृदयरोग विभागातील तंत्रज्ञ प्रणय गवई, वैभव लुटे, कमलेश पलेरिया या सहकाऱ्यांच्या सहाय्याने रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे अतिरिक्त सर्कीट नष्ट करण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या अंमलात आणली. विशेष म्हणजे, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर उपचार करण्यात आल्याने रुग्णाच्या परिवाराला ही सेवा मोफत उपलब्ध झाली.विदर्भात हृदयाला दुहेरी सर्कीट असणाऱ्या रूग्णांची संख्या बरीच असून त्यांना विनामुल्य अथवा अत्यल्प खर्चात रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे उपचार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे डॉ. मनक्षे यांनी यावेळी सांगितले.(शहर प्रतिनिधी)