चालकाला कार्यालयाबाहेर काढले : महिला वाहकाविषयी अर्वाच्च शिवीगाळदेवळी : येथील ठाण्याच्या धुंदीत असलेल्या पोलीस शिपायाने कर्तव्यावर असलेल्या बसचालकाला बेदम मारहाण केली. मध्यरात्रीच्या वेळेस गस्तीवर असताना या शिपायाने दोन वेळा बसस्थानकावर जावून चालकासोबत असभ्य व्यवहार केला. बसगाडीच्या महिला वाहकाला सुद्धा याठिकाणी झोपवून का घेतले नाही, अशी विचारणा करून चालकाला कार्यालयाबाहेर काढून कार्यालयाला कुलूप ठोकले. हा विचित्र प्रकार सोमवारी (दि. १९) रात्री दीड ते तीन वाजताच्या सुमारास घडला. बस कामगार संंंंंघटनेने या घटनेचा निषेध करून सदर शिपायाच्या निलंबनाची मागणी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, पुलगाव डेपोची ८४९५ ही देवळी-गौळ ही हाल्टींग बस देवळी स्थानकावर रात्री ९.३० वाजता उभी करण्यात आली. गाडीचा चालक संजय कुंडलीक मडावी यांनी रात्रीला झोपण्याची व्यवस्था म्हणून स्थानकावरील कार्यालयाचा आसरा घेतला. या बसगाडीची वाहक महिला असल्यामुळे तिला स्थानकावर न थांबविता घरी पाठविण्यात आले. रात्रीला दीड वाजताच्या सुमारास गाडीचा चालक गाढ झोपेत असताना प्रबुद्ध धनवीज नामक पोलीस शिपायाने एका गार्डसहित दुचाकीने स्थानकावर येत चालक गेडाम यांना असभ्यतेची वर्तवणूक दिली. तू याठिकाणी एकटा कसा आहे. महिला वाहक याठिकाणी झोपली का नाही. तिचा मोबाईल नंबर पाहिजे आहे असे अनेक प्रश्न विचारले. शिवाय गेडाम यांना कार्यालयाबाहेर काढून कुलूप लावण्यात आले. पुन्हा रात्री ३.२० वाजताच्या दरम्यान पोलीस व्हॅनसह एका गार्डसहित येवून गेडाम यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या अंगावरील कपडेही फाडण्यात आले. यावेळी धनवीज हा धुंदित असल्याचे गेडाम यांनी सांगितले. रात्री पोलीस निरीक्षक दीपक साखरे यांची डिव्हीजन पेट्रोलिंगसाठी होती. पोलीस ठाण्यात त्यांची रवानगी करताना धनवीज याच्याकडे पोलीस जीप कशी काय आली, अशी विचारणा महामंडळाच्या युनियनने केली. या प्रकरणात साखरे हे स्वत:चा बचाव करीत असल्याचा आरोप बस कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे देवळी पोलिसांकडून सांगण्यात आले. खा. रामदास तडस यांनीही घटनेची निंदा केली.(प्रतिनिधी)दिवसभर रंगले देवळी ठाण्यात तक्रारनाट्य, पोलिसांकडून सावरासावरयेथील परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीच्या प्रकाणात गुन्हा दाखल करण्याकरिता चालकाने तक्रार केली. मात्र गुन्हा दाखल करण्याकरिता देवळी पोलिसांकडून सतत टाळाटाळ करण्यात आली. कर्मचाऱ्याने लिहिलेली तक्रार स्पष्ट दिसत नसल्यने मंगळवारी गुन्हा दाखल करणे शक्य झाले नसल्याचे पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले. सोमवारी मध्यरात्रीला घडलेल्या घटनेची तक्रार मंगळवारी दिवसभर करण्यात आली नाही. यामुळे पोलिसांकडून त्यांच्या कर्मचाऱ्याचा बचाव करण्यात येत असल्याचा आरोप येथे उपस्थित महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी केला. या प्रकरणातील कर्मचाऱ्याची आजच वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली असला ती पोलिसांकडून फेटाळण्यात आली. पोलीस शिपाई धनवीज नशेत होता हे खरे आहे. त्याने वाहन चालक गेडाम यांना मारहाण केल्याचेही वास्तव आहे. या प्रकरणी चालक गेडाम यांनी दिलेली तक्रार ओबड धोबड असल्याने आज गुन्हा दाखल करण्यात आला नाही. उद्या या प्रकरणी नवी तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. - दीपक साखरे, ठाणेदार, देवळी
मद्यधुंद पोलीस शिपायाचा बसस्थानकावर धिंगाणा
By admin | Updated: October 21, 2015 02:12 IST