शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-सीएसटी दुरांतो एक्स्प्रेसमध्ये मद्यपींचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 14:50 IST

नागपूर ते सीएसटी (मुंबई) दुरांतो या सुपरफास्ट रेल्वेगाडीत चार मद्यपींनी धुडगूस घालत तिकीट तपासनीसासह डॉक्टरांना मारहाण केली. शिवाय प्रवाशांनाही जेरीस आणले. ही घटना रविवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास पुलगाव रेल्वे स्थानकावर घडली.

ठळक मुद्देडॉक्टर व टीसीला मारहाण पुलगाव येथील घटना, चौघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर ते सीएसटी (मुंबई) दुरांतो या सुपरफास्ट रेल्वेगाडीत चार मद्यपींनी धुडगूस घालत तिकीट तपासनीसासह डॉक्टरांना मारहाण केली. शिवाय प्रवाशांनाही जेरीस आणले. ही घटना रविवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास पुलगाव रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे सुरक्षा दल व पुलगाव पोलिसांनी चौघांना अटक केली.१२२९० नागपूर-सीएसटी दुरंतो एक्स्पे्रस ही गाडी नागपूर येथून रात्री ८.४० वाजता सुटते. रविवारी रात्री गाडी रवाना झाल्यानंतर नागपूरपासूनच काही युवकांनी मद्यधुंद अवस्थेत धुडगूस घालण्यास सुरूवात केली. ते मुंबई येथे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात आले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाºया तिकीट तपासणीस बीसीकर योगेंद्र तथा डॉ. पंकज पाठे यांना मारहाण केली. युवकांच्या धिंगाण्यामुळे दुरंतोमधील प्रवाशी जेरीस आले होते.याबाबत तिकीट तपासणीस योगेंद्र यांनी रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार केली. यावरून रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाºयांसह पुलगावचे पोलीस उपनिरीक्षक मौजे व ताफ्याने गाडीत धुडगूस घालणाºया मदनमोहन तिवारी (३२), अनिल भीमराव गजभिये (३८), मारोती मधुकर बारापात्रे (३९) सर्व रा. नागपूर आणि अमित किसन शर्मा (३६) रा. अमरावती या मद्यपींना ताब्यात घेतले. यातील डॉक्टर व टीसीला मारहाण करणाºया अमित शर्मा याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मदनमोहन, अनिल व मारोती हे तिघे रेल्वे पोलीस बलाच्या ताब्यात असून त्यांच्यावर १४५/१४६ रेल्वे अ‍ॅक्ट अन्वये गुन्हे दाखल केल्याची माहिती आरपीएफ प्रमुख सुरेश कांबळे यांनी दिली.पिंटोग्राफ तुटल्याने दुरांतो थांबविलीच्१२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस पुलगाव रेल्वे स्थानकावरून निघाली असता पिंटोग्राफ तुटला. यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. पिंटोग्राफ दुरूस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे नागपूर-सीएसटी दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, वर्धा-भुसावळ पॅसेंजर या प्रवासी गाड्यांसह मालगाड्या कवठा, दहेगाव व वर्धा रेल्वे स्थानकावरच थांबविण्यात आल्या होत्या. नागपूर येथून सुटल्यानंतर थेट भुसावळला थांबणारी दुरंतो एक्स्प्रेस पुलगावला थांबली. यामुळे धुडगूस घालणाºया आरोपींना अटकाव करता आला.