शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नदी पात्राचे खोलीकरण गावकर्‍यांना मिळाला दिलासा

By admin | Updated: May 11, 2014 00:35 IST

शासनाच्या पाठोपाठ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी अन्य संस्थांचेही हात सरसावले आहेत़ बजाज फाऊंडेशन नामक संस्थेने नाला सरळीकरणाचे काम हाती घेत ते पूर्ण केले़

झडशी : शासनाच्या पाठोपाठ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी अन्य संस्थांचेही हात सरसावले आहेत़ बजाज फाऊंडेशन नामक संस्थेने नाला सरळीकरणाचे काम हाती घेत ते पूर्ण केले़ शेतात पाणी शिरून होणारे संभाव्य नुकसान टळल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे़ कित्येक वर्षांपासून पंचधारा नदी पात्रात उन्हाळ्याची चाहुल लागताच फेब्रुवारी-मार्च महिन्यात एकही थेंब पाणी राहत नव्हते़ यामुळे गावातील गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या भिषण झाली होती़ शिवाय गावातील वा नदीकाठच्या शेत परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळीदेखील जलदगतीने कमी होत होती़ यामुळे पिकांना पाणीदेखील अपूरे पडत होते़ पावसाळ्यात येणार्‍या पुरामुळे गावातील नदीकाठच्या लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होत होते़ सर्व समस्या निकाली काढण्यासाठी बजाज फाऊंडेशनद्वारे नदी पात्राच्या खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले़ विवेक हळदे, गजानन उडाण व अन्य सहकार्‍यांच्या पुढाकाराने लोकप्रतिनिधींचा निधी व लोकवर्गणी गोळा करण्यात आला़ पंचधारा नदीच्या खोलीकरणासह रूंदीकरणाचे काम करण्यात आले़ उर्वरित काम १५ दिवसांनी सुरू होणार असल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांनी दिली़ यामुळे गावातील अनेक समस्या सुटल्यात़ पावसाळ्यातील पुराचा धोका कमी झाला असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली़ नदी परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरींची पाणी पातळी वाढल्याने पिकांना ओलित करणे सोईस्कर झाले आहे. या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या कामामुळे गावातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)