शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या खरिपात ओलितापेक्षा कोरडवाहू शेती ठरली फायद्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 21:56 IST

यंदाचा खरीप प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांकरिता नुकसानीचा ठरला आहे. पावसाची प्रतीक्षा, बोगस बियाने यातून बचावलेला कापूस उत्पादक बोंडअळीच्या संकटात अडकला. हे संकट ओलितावर अधिक दिसून आल्याने कोरडवाहू शेतकरी यातून बचावल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देकपाशीच्या उत्पादनात तूट : किडीचे प्रमाण ओलितावरच अधिक; सोयाबीनचीही तिच स्थिती; तुरही सुकण्याच्या मार्गावर

किशोर तेलंग।लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टालाटुले) : यंदाचा खरीप प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांकरिता नुकसानीचा ठरला आहे. पावसाची प्रतीक्षा, बोगस बियाने यातून बचावलेला कापूस उत्पादक बोंडअळीच्या संकटात अडकला. हे संकट ओलितावर अधिक दिसून आल्याने कोरडवाहू शेतकरी यातून बचावल्याचे दिसत आहे. कपाशीचे जेही उत्पादन झाले ते कोरडवाहू क्षेत्रातीलच असल्याचे दिसते.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात २ लाख ८० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. बºयाच शेतकऱ्यांनी उत्तम उत्पादनाकरिता ओलीत करण्याचे नियोजन केले. हेच ओलित शेतकऱ्यांकरिता आता नुकसानीचे ठरत असल्याचे दिसून आले आहे. बीटी कपाशीवर कीड येत नसल्याचे अनेक कंपन्यांनी सांगितले. पण त्यांचा हा दावा यंदा फोल ठरला. बिटीच्या बियाण्यांवर बोंड आणि गुलाबी अळीने चांगलाच हल्ला केला. या अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी चांगलाच हैराण झाला. अळीचा हल्ला ओलिताच्या क्षेत्रात अधिक असल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी ओलित करून कपाशीचे पीक घेतले. या शेतकऱ्यांच्या शेतात या किडीने मोठ्या प्रमाणात हैदोस घातल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागानेही सुमारे ८० टक्के शेतात बोंडअळीचा प्रकोप झाल्यायचे म्हटले आहे. उर्वरीत वीस टक्के शेतकरी कोरडवाहू कापूस घेणारे आहे. कोरडवाहू पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा उत्तम उत्पादन झाल्याचे बोलले जात आहे. कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात आतापर्यत कापसाची दोन वेळा वेचणी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रारंभी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तिसऱ्या वेच्याची शक्यता नसल्याचेच चित्र आहे.दरवर्षी या भागात तिजेपर्यंत कापूस चालतो. पण यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीवर कीड आल्याने जानेवारी महिन्यातच उलंगवाडी होण्याचे चित्र आहे. कोरडवाहू शेतातील कापूस निघून डिसेंबर महिन्यातच उलंगवाडी झाली आहे. यामुळे कपाशीचे यंदा अपेक्षेपेक्षा उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी बाजारात झालेली आवक गत वर्षीच्या तुलनेत विशेष कमी नसल्याचे दिसून आले आहे. बाजारात कपाशीची झालेली आवक ही पहिल्या वेच्यातलच असावी असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. येत्या दिवसात यात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे.ओलितापेक्षा कोरडवाहूची उतारी अधिकसाधारणत: ओलिताची सोय असलेला शेतकरी अधिक उत्पन्न घेत असल्याचे आतापर्यंत दिसून आले. यंदा मात्र हा नियम बदलल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या खरीपात कोरडवाहू शेतकऱ्याला एकरी आठ क्विंटल तर ओलित असलेल्या शेतकऱ्याला पाच क्विंटलचीच उतारी आली आहे.शेतकरी उधारी फेडण्याच्या विवंचनेतदरवर्षी शेतकरी सावकाराकडून, कृषी केंद्रातून उधारीवर बियाणे, खत, औषध घेवून शेती चालवितो. अशातच या वर्षी मजुराचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने काही शेतकऱ्यांनी शहरातून मजूर आणून कापूस वेचला. २० किलो कापूस वेचण्यासाठी २०० रुपये मोजावे लागले. त्यातही प्रारंभी ४,१०० ते ४,५०० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कापूस विकावा लागला. यावर्षी बोंडअळीने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले. त्यामुळे सावकाराकडून घेतलेले कर्ज, कृषी केंद्र चालकाची उधारी कशी द्यावी या विवंचनेत शेतकरी आहे. यामुळे शासनाने योग्य सर्व्हे करून या भागातील बोंडअळीची मदत सरसकट द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :cottonकापूस