शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

बॅक वॉटरच्या नुकसानीचे ड्रोनने सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच्या दमदार पावसाने पहिल्यांदा शंभर टक्के भरला.

ठळक मुद्देशेती व घरांच्या नुकसानीची माहिती घेणार : चार पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : यावर्षीच्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प पहिल्यांदाच शतप्रशित भरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात परिसरातील संपादीत केलेल्या क्षेत्रासह इतरही भागात शिरल्याने शेती व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे.आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच्या दमदार पावसाने पहिल्यांदा शंभर टक्के भरला. त्यामुळे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात कापूस सोयाबीनसह हळद, अद्रक आदी पिकांचाही समावेश आहे.बॅक वॉटरच्या पाण्यामुळे संपादीत क्षेत्रासह इतर भागातील घरे व शेतजमिनीचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने पुनर्वसन विभागाच्यावतीने तीन दिवसांपासून नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरु केले आहे.प्रकल्पाच्या बॅक वॉटरचे पाणी कुठपर्यंत पसरले तसेच या पाण्यामुळे शेतीचे किती नुकसान झाले याबाबत योग्य माहिती गोळा करण्याकरिता ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची योग्य माहिती मिळण्यासाठी मदत होेणार आहे.यासोबतच परिसरातील इतरही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर, त्या शेतकऱ्यांनी पुनर्वसन कार्यालयाकडे रितसर तक्रार करावी, त्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन सर्वेक्षण केले जाईल असे आवाहन विभागाने केले आहे. या सर्वेक्षणाकरिता पुनर्वसन विभागाचे उपविभागीय अभियंता वºहाडे, पांढरे व डांगे प्रयत्नशील आहे.विभागाचा पारदर्शक सर्वेक्षणासाठी प्रयत्ननिम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच सर्वेक्षणात पारदर्शकता आणण्यासाठी ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने मदत घेणे सुरू आहे. सर्वेक्षणानंतर जर शेतकरी आरोप-प्रत्यारोप करत असतील तर त्यांना ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने सर्वेक्षण केल्याची सीडी दाखविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यात लोअर वर्धा प्रकल्प १०० टक्के भरल्यास पाणी कुठपर्यंत पसरणार तसेच किती शेतकऱ्यांचे नुकसान होईल, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची जमीन संपादीत आहे किंवा नाही, बॅक वॉटरमुळे किती नुकसान झाले, याबाबतची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकºयावर अन्याय होणार नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प