अपघाताला कारणीभूत : हमदापूर मार्गावरील प्रकारसेवाग्राम : हमदापूर मार्गावरील शिवनगर चौकातील गतिरोधक अधिक उंचीचे असल्याने अपघातास कारणीभूत ठरत आहे. या गतिरोधकाची उंची कमी करण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे. शिवनगर चौकात दोन ठिकाणी गतिरोधक तयार केले आहे. या चौकाचे रूंदीकरण केल्याने रस्त्यावर गतिरोधक तयार केले. रस्ता विस्तारीकरणाने नागरिकांची सुविधा झाली. मात्र यावरील गतिरोधक डोकेदुखी ठरत आहे. या चौकातून देऊळगाव, चारमंडळ, सेवाग्राम व हमदापूरकडे रस्ता जातो. या चौकात वर्दळ असते. येथे वाहनांची सतत ये-जा सुरू राहत असल्याने गतिरोधक तयार केले. वाहनांची गती नियंत्रीत झाली. मात्र वाहन धारकांना या गतिरोधकावरुन वाहन घेऊन जाणे जिकरीचे ठरत आहे. गतिरोधक गती कमी करण्यासह वाहन धारकांना खाली पाडण्यास कारणीभूत ठरत आहे. यात अनेकांना शारीरिक इजा झाली असून गतिरोधकाची उंची कमी करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)
उंच गतिरोधकामुळे वाहनचालकांना मनस्ताप
By admin | Updated: October 27, 2016 00:52 IST