शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाहकाच्या अरेरावीचा फटका

By admin | Updated: June 7, 2015 02:27 IST

नादुरूस्त झालेल्या एसटी गाडीतील प्रवाश्यांना दुसऱ्या गाडीत बसवून दिल्यानंतर त्या प्रवाश्यांना त्यांच्या थांब्यावर उतरवून देण्यास नकार देत

वरूड-वर्धा एसटीतील प्रकार : प्रवाश्यांना नाहक भुर्दंडवर्धा : नादुरूस्त झालेल्या एसटी गाडीतील प्रवाश्यांना दुसऱ्या गाडीत बसवून दिल्यानंतर त्या प्रवाश्यांना त्यांच्या थांब्यावर उतरवून देण्यास नकार देत प्रवाश्यांना मनस्ताप देण्याचा प्रकार वरूड-वर्धा गाडीच्या वाहकाने केला. याबाबत विभागीय नियंत्रकांनी दखल घेऊन संबंधितांना प्रवाश्यांसोबत सौजन्याचा व्यवहार करण्याची सूचना द्यावी, अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे.तळेगाव आगाराची मोर्शी ते वर्धा फेरी आष्टी येथून सकाळी ८.३० वाजता निघाली. या बसची वाहक महिला होती. याच एसटीने अभियंता रितेश राजुरकर प्रवास करीत होते. त्यांनी मोर्शी-वर्धा फेरीच्या वाहकाकडून तळेगाव (रघुजी) करिता प्रवास तिकीट घेतली होती. ही गाडी तळेगावलाच नादुरूस्त झाल्याने गाडीतील प्रवाशांना आर्वी आगाराच्या वरूड-वर्धा (गाडी क्रमांक एमएच ४०-एन ८७७६) गाडीत पुढील प्रवासाकरिता बसवून देण्यात आले. पण गाडी आर्वी येथे येताच वरूड मोर्शी गाडीचा वाहकाने अभियंता रितेश राजुरकर यांना तळेगाव (रघुजी) येथे उतरवून देणार नाही, असे सांगितले. यावर रितेश राजुरकर यांनी आर्वीच्या बसस्थानक नियंत्रककाकडे तक्रारी केली. त्यानी रितेश राजुरकर यांना तळेगाव (रघुजी) येथे उतरवून देण्यास सांगितल्यावर वाहकाने होकारात्मक मान हलविली. पण गाडी पिंपळखुटा येथे आली असता वाहक मोहेकर यांनी प्रवासी रितेश राजुरकर यांच्याशी वाद सुरू केला व तळेगाव रघुजी येथे उतरवून देण्यास नकार देत त्यासंना पिंपळखुटा येथेच उतरण्याचे फर्मान सोडले. रितेश राजुरकर यांनी केलेली विनंती धुडकावीत तळेगाव (रघुजी) ची तिकीट असताना त्यांना पिंपळखुटा येथे उतरण्यास भाग पाडले धास्तावेल्या रितेशला पिंपळखुटा येथे उतरावे लागल्यानंतर दुसऱ्या गाडीने पुन्हा पैसे मोजत तळेगाव (रघुजी) येथे जावे लागले.एवढ्यावरच या गाडीच्या वाहकाचा प्रताप थांबला नाही तर मोर्शी-वर्धा गाडीची तिकीट घेऊन बसलेल्या तीन मुलींनाही त्याने त्रास दिला, अशी माहिती रितेश राजुरकर यांनी दिली. परतीच्या प्रवासात रितेश राजुरकर यांनी या वाहकाबाबत आर्वीच्या आगार व्यवस्थापकाकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता आगार व्यवस्थापकाने तक्रार घेण्यास नकार देत पुन्हा अभियंता रितेश राजुरकर यांना मानसिक त्रास दिला. यामुळे एसटी प्रवाश्यांच्या सोयीसाठी आहे वा नाही, प्रश्न उपस्थित होत आहे. गंभीर असलेल्या या प्रकरणात विभागीय नियंत्रक काही कारवाई करतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(प्रतिनिधी)