शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निळ्या दिव्याच्या वाहन चालकाचा हॉटेलात धिंगाणा

By admin | Updated: October 23, 2016 02:18 IST

‘शासकीय वाहनांचा वर्धेत गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना आहेत. यात आणखी भर पडली असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहन चालकाने

हॉटेल मालकाने दिला चोप : पैसे देण्यावरून केली शिवीगाळवर्धा : ‘शासकीय वाहनांचा वर्धेत गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना आहेत. यात आणखी भर पडली असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहन चालकाने हॉटेलात जात नशेत धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला. यात अखेर वाहन चालकाच्या धिंगाण्याने त्रस्त झाल्याने हॉटेल मालकाने या वाहन चालकाला चांगलाच चोप दिला. या घटनेची चर्चा शहरात दिवसभर असून या प्रकरणी अधिकाऱ्यांनी शोध घेत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान यवतमाळ-नागपूर बायपासवर असलेल्या एका हॉटेलमध्ये निळा दिवा असलेले शासकीय वाहन गेले. त्या वाहनात अधिकारी नाही तर केवळ चालकच होता. चालकाने वाहनातून उतरून हॉटेलमध्ये जाऊन पाण्याची बॉटल व दोन पापड मागितले आणि खिशातील दारूची शिशी काढून तेथेच रिचवायला सुरुवात केली. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहनातून उतरलेला चालक चक्क ही पातळी पार करीत असल्याचे पाहून हॉटेलमधील इतर ग्राहकांना आश्चर्य वाटले. चालक महाशय हळूहळू नशेत झिंगत राहिले. जेव्हा बील द्यायची वेळ आली तेव्हा सदर वाहन अमुक अमुक अधिकाऱ्याचे आहे, अशी धमकी देत अधिकाऱ्याच्या नावाचा उद्धार करायला सुरुवात केली. पाहता-पाहता चालकाची जीभ घसरली आणि त्याने हॉटेलमालकाला शिवीगाळही करायला सुरुवात केली. शेवटी सहनशीलता संपल्यावर मालकानेही चालकाला चोप देत त्याची जागा दाखवून दिली. चालकाच्या या प्रतापामुळे एका जबाबदार अधिकाऱ्याचीही नामुष्की झाली. त्यामुळे आता शासकीय वाहनचालकांना आवर घालण्याची गरज असून या वाहन चालकावर कारवाई गरजेची आहे.(प्रतिनिधी)शासकीय वाहने चालकांच्या ताब्यात वर्धा शहरातच नव्हे तर जिल्ह्यात शासकीय वाहने रात्रीला चालकांच्या ताब्यात असल्याचे समोर आले आहे. नियमानुसार चालकाने ते कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. जिल्ह्याचा मुख्य अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांची वाहने त्यांच्या चालकांच्या ताब्यात राहतात. या चालकांकडून त्या वाहनाचा रात्रीच्या वेळी काय उपयोग होतो, याची कधी शहानिशा होत नाही.