शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

चालक व वाहक जागीच ठार

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

दुचाकीला धडक देत पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात ट्रकचा चालक व वाहक ट्रकखाली दबल्याने जागीच ठार झाले तर दुचाकी चालक जखमी झाला.

कुरझडी येथील घटना : माती आणण्याकरिता जाणारा ट्रक उलटला वर्धा : दुचाकीला धडक देत पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात ट्रकचा चालक व वाहक ट्रकखाली दबल्याने जागीच ठार झाले तर दुचाकी चालक जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कुरझडी (फोर्ट) येथे घडली. ट्रक चालक विकास गायकवाड रा. शांतीनगर व वाहक नरेश सोनुले रा. नागठाणा अशी मृतकांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदी (मेघे) परिसरातील एका वीटभट्टीकरिता माती आणण्याकरिता ट्रक एम एच ०४ एस ५४२ ने चालक विकास गायकवाड व वाहन नरेश सोनुले हे दोघे जात होते. दरम्यान, कुरझडी (फोर्ट) येथील वायफड येथून कुरझडीकडे जात असलेल्या एमएच ३२ एल ९२९३ या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी चालक राजू सराटे रा. कुरझडी (फोर्ट) हा जखमी झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर नागरिक आपल्यामागे लागतील या भीतीपोटी विकास याने वाहन भरधाव चालवून पळण्याचा प्रयत्न केला.या प्रयत्नात त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यात ट्रकखाली दबून ट्रक चालक व वाहक दोघेही गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी दोनही जखमींना उपचारार्थ रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी भादंविच्या २७९, ३३७, ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मृतकांत विकास गायकवाड रा. शांतीनगर व वाहक नरेश सोनुले यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी) आॅटोरिक्षाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमीबोरधरण- येथून बोरी गावाकडे येत असलेल्या दुचाकीला विरूद्ध दिशेने आलेल्या आॅटोने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाले. हा अपघात बोरधरण ते हिंगणी मार्गावर वनविभागाच्या नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झाला. बोरधरण येथून राजेंद्र गणपत भांगे (४२) व सागर विजय वानखेडे (२०) दोघेही रा. बोरी हे एमएच ३२ - ३८४८ या दुचाकीने बोरीकडे येत होते. दरम्यान ईश्वर वासुदेव कोवार याने त्याच्या ताब्यातील एमएच ३२-४२८२ हा आॅटो भरधाव चालवून दुचाकीवर धडक दिली. यात राजेंद्र भांगे व सागर वानखेडे हे दोघेही जखमी झाले. दोघांनाही प्राथमिक आरोग्य केंद्र सेलू येथे आणण्यात आले असता प्रथमोपचारानंतर सागर वानखेडे याला सेवाग्राम येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या प्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (वार्ताहर)