शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पुढे आलू मागे दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 22:04 IST

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारूविक्री करताना अनेक क्लृप्त्या काढत असल्याचे दिसून आले आहे. वर्धेत होत असलेले हे प्रकार आता चंद्रपुरातही होत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देचंद्रपूर येथील दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारूविक्री करताना अनेक क्लृप्त्या काढत असल्याचे दिसून आले आहे. वर्धेत होत असलेले हे प्रकार आता चंद्रपुरातही होत असल्याचे दिसते. याच प्रकारातून मालवाहूत समोर आलू (बटाटे) आणि त्याच्या मागे दारूच्या पेट्या नेत असलेले वाहन समुद्रपूर पोलिसांनी जप्त करून चंद्रपूर येथील दोन दारूविक्रेत्यांना अटक केली.दीपक मलच्या मंचनवार रा. बाबुपेठ व योगेश देशराज शाहू रा. गाडगेबाबा चौक जि. चंद्रपूर अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल दीड लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली. इतर साहित्यासह एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.समुद्रपूर पोलीस, गुरुवारच्या सकाळी ७.३० ते ८.३० वाजताच्या दरम्यान जाम चौरस्ता येथे नाकेबंदीवर होते. दरम्यान त्यांना एमएच ३४ बीजी १६५ क्रमांकाच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर येथे दारूसाठा जात असलेल्या असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सदर क्रमांकाच्या वाहनाची झडती घेतली असता आलूचा कॅरेटच्या मागे मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे दिसमन आले. वाहनाची तपासणी केली असता आलू भरलेल्या ४७ कॅरेटच्या मागे विदेशी दारूच्या ८० पेट्या असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. यात दीपक मंचनवार व योगेश शाहू या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्य मार्गदर्शनाखाली पीएसआय श्रीकांत कडू, गणेश इंगोले, प्रेमराज अवचट, राहुल गिरडे, संजय सूर्यवंशी, नितीन ताराचंदी, गजानन कठाणे, यशवंत गोल्हर यांनी केली.