शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

वणा नदीला घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:50 IST

गाव शहरातून नदीत मिळणारे दूषित पाणी, त्यात येत असलेला कचरा व रेती माफियांकडून नदीपात्रात झालेले खड्डे आणि पात्रात वाढलेली जलपर्णी यामुळे नदीचे स्वास्थ धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देहिंगणघाटची जीवनदायिनी दूषित होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : गाव शहरातून नदीत मिळणारे दूषित पाणी, त्यात येत असलेला कचरा व रेती माफियांकडून नदीपात्रात झालेले खड्डे आणि पात्रात वाढलेली जलपर्णी यामुळे नदीचे स्वास्थ धोक्यात आले आहे. अशीच अवस्था हिंगणघाट येथील वणा नदीची झाली आहे. या नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात कचरा दिसत आहे. शिवाय या कचऱ्यामुळे नदीचे पाणीही दूषित झाल्याचे दिसत आहे. यामुळे शासनाने नदी स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.हिंगणघाट तालुक्याची जीवनदायीन असलेल्या या वणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याचे दिसत आहे. पाण्यात शहरातून येत असलेल्या नाल्याचे दूषित पाणी येत असल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नदीपात्राकडे गेल्यास येणाºया दुर्गंधीमुळे ही नदी की विस्तारीत झालेला नाला याचा अंदाज घेणे कठीण होते. यामुळे हिंगणघाट प्रशासनाने या नदीची स्वच्छता करण्याची गरज आहे. वर्धेत मध्यंतरी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच अभियाने येथे राबवून वणा नदी स्वच्छ करण्याची गरज आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी लक्ष देत येथे कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.रेती माफियांमुळे पात्रात खड्डेजिल्ह्यात अवैध रेती उपसा जोरात सुरू आहे. याला जिल्हा प्रशासनाकडून मोठे पाठबळ मिळत असल्याचे अनेकवार समोर आले आहे. याच रेती माफियांकडून रेती उपस्याकरिता येथे खड्डे करण्यात आले आहे. या खड्ड्यात आता पाणी साचून राहत असून त्यात अडलेल्या कचऱ्यांमुळे दुर्गंधी पसरत आहे. अशाच खड्ड्यात बुडून गत दोन वर्षांपूर्वी दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. यामुळे नदी पात्रात पडलेले खड्डे धोक्याचे ठरत आहे. याच नदीत नाही तर वर्धा जिल्ह्यातील अनेक नदीत असे खड्डे पडले आहेत. ते बुजविण्याकरिता काही उपाययोजना आखण्याची गरज आहे. शिवाय हिंगणघाट शहरातील सामाजिक संघटनांनीही एकत्र येत आपल्या शहरातील नदीपात्र स्वच्छ करण्याची जबाबदारी उचलण्याची गरज आहे.शहरातील दूषित पाणी नदीपात्रातहिंगणघाट शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शिवाय या तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे. या उद्योगातील आणि शहरातील मोठ्या नाल्यातील पाणी दूषित पाणी या नदीच्या पात्रात येत आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. यामुळे नगर परिषदेने शहरातील पाणी नदीत येणार नाही या याकरिता काही उपाय योजना आखण्याची गरज आहे.नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे दिसून आले आहे. हा कचरा नदी शेजारी असलेल्या गावांतील नागरिकांकडून टाकण्यात आल्याचे दिसत आहे. या कचºयामुळे नदीचे पात्र दूषित होत आहे. हा परिसर स्वच्छ करण्याकरिता येथील पर्यावरणवादी संघटनांनी एकत्र येत कार्य करण्याची गरज येथे निर्माण झाली आहे.