शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लघु पाटबंधारे विभागाच्या नालीचा झाला नाला

By admin | Updated: May 29, 2017 01:13 IST

जलयुक्त शिवार अभियान राबविणे सुरू आहे; पण यात काही विपरित परिणाम होत असल्याचे दिसते.

अर्धा एकर शेताचे नुकसान : नालीचे सिमेंटीकरण करण्याकडे वर्षभरापासून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी) : जलयुक्त शिवार अभियान राबविणे सुरू आहे; पण यात काही विपरित परिणाम होत असल्याचे दिसते. येथील शेतकरी दिनेश दमडू डायरे यांचे सर्व्हे क्र. ७२/१ मध्ये ४ एकर शेत असून शेतातून कालवा गेला आहे; पण समोर जागा नसल्याने कालव्याचे पाणी काढण्यासाठी शेतातून नाली काढली होती. या नालीचा नाला झाला. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. कालव्याचे पाणी वाहून जावे म्हणून शेतातून नाली करण्यात आली. या बाबीस एक वर्षाचा कालावधी लोटला. नाली करीत असताना लघु पाटबंधारे विभागाला कळविण्यात आले होते. यावर अधिकाऱ्यांनी नालीचे सिमेंटीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते; पण अद्याप बांधकाम करण्यात आले नाही. परिणामी, मागील हंगामात पाणी सोडल्यामुळे नालीचा नाला झाला आहे. सदर नालीचे आणखी काही दिवस बांधकाम न झाल्यास नाला आणखी रूंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे तब्बल अर्धा एकर शेतजमीन खराब झाली आहे. यामुळे नुकसान सोसावे लागत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नालीचे बांधकाम त्वरित करावे व शेताची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. शासकीय विभागाला जागा देणे पडले महाग दिनेश डायरे यांच्या शेतातून कालवा गेला आहे. या कालव्याचे पाणी काढण्याकरिता समोर जागा नसल्याने सदर शेतकऱ्याच्या शेतातून नाली करण्यात आली होती. यासाठी सदर शेतकऱ्याने कुठलीही हरकत घेतली नाही. शासकीय विभागाला विनामूल्य जागा देत नाली करण्यास सांगितले; पण वर्षभरापासून नालीचे सिमेंटीकरण करण्यात आले नाही. यामुळे कालव्याच्या पाण्यामुळे नालीचा नाला होऊन शेताचे मोठे नुकसान झाले.